शिरूर : टाकळी भिमा येथील आदर्श शिक्षक दत्तात्रय वडघुले यांची मुलगी वैष्णवी वडघुले हिने दहाविमधे ९५.२० % गुणांसह घवघवीत यश मिळविले. त्यामुळे गावासह वडघुले परिवाराचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकावले आहे. याबद्दल सर्वत्र वैष्णवीचे कौतुक केले जात आहे.
दहावीचा नुकताच जाहीर झाला. यावर्षी सर्वत्र निकाल विक्रमी आहे. सर्वांनाच भरघोस गुण मिळाले. या लखलखाटात वैष्णवीनेहि प्रकाश टाकला आहे. हेच तिच्यासाठी शंभर टक्के खणखणीत यश आहे.
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःहून दिवस-रात्र अभ्यासात रमत वैष्णवी हिने हे यश मिळवलं. वडिलांचा शिक्षकी पेशा असल्याने घरातच चांगले प्रोत्साहन व प्रेरणा मिळत गेली. त्यामुळे वडिलांचे मौलाचे मार्दर्शन वेळोवेळी भेटत गेल्याने हे यश संपादन करू शकले असे वैष्णवी सांगते.