वाकड I झुंज न्यूज : वाकड येथील हभप. महादेवमहाराज श्रीपती भुजबळ मित्र परिवाराच्या वतीने परिसरात विविध प्रजातींच्या शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच विविध पदावर निवड झालेल्या व शासन पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
महापालिका वृक्षसंवर्धन समितीवर सदस्य म्हणून निवडलेले हिरामण भुजबळ, महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळविणारे हणमंत माळी, गुणवंत कामगार सूर्यकांत ताम्हणे यांचा सन्मान नगरसेवक राहुल कलाटे, माजी स्विकृत सदस्य मोहन भुमकर, माजी सरपंच राजेंद्र भुजबळ, शिवसेना नेते अशोक भुजबळ, सावता महाराज पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष काळूराम भुजबळ, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पीडिसी बँकेचे शंकर भुजबळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
यावेळी अनिल पारखे, हभप काळुराम भुजबळ, विलास भुजबळ, चंद्रकांत भुजबळ, रामहारी भुजबळ, तुषार भुजबळ, मुकेश भुजबळ, मयूर सायकर, साहेबराव भुजबळ व काळूराम वाघमारे हे उपस्थित होते. गणेश भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र भुजबळ यांनी आभार मानले. संयोजन हभप महादेव महाराज भुजबळ यांनी केले.