लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, वाघोली, कुंजीरवाडी, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, शेवाळवाडी, पेरणे, आव्हाळवाडी, खामगाव टेक या अकरा ग्रामपंचायत हद्दीतील कंटेनमेंट (प्रतिबंधीत क्षेत्र) झोनची सायंकाळी नव्याने पुर्नरचना करण्यात आली आहे.
या ग्रामपंचायत हद्दीतील मायक्रो कंटेनमेंट झोन वगळता उर्वरीत भागातील सर्व प्रकारची दुकाने व व्यवहार सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या दरम्यान चालू करण्यास हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी परवानगी दिली आहे.
मायक्रो कंटेनमेंट झोन हद्दीत मात्र अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत व्यवहार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच, मायक्रो कंटेनमेंट झोन हद्दीत मात्र अत्यावश्यक सेवाही केवळ सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान चालू ठेवता येणार असल्याचेही सचिन बारवकर यांनी या वेळी स्पष्ठ केले आहे.
दरम्यान, कंटेनमेंट झोनच्या पुर्नरचनेमुळे पूर्व हवेलीमधील व्यवहार सुरु होणार असल्याने व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे.