मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे ‘प्लाॅझ्मा दान संकल्प’ अभियान सुरु

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे २७ जुलै पासून ‘प्लाॅझ्मा दान संकल्प’ अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान ३ आॅगस्ट २०२० पर्यंत सुरु राहणार आहे. ‘चला कोरोनाला हरवूया, चला प्लाझ्मा दान करूया’ या मोहिमेअंतर्गत ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी शिवसेनेकडून कोरोनामुक्त झालेल्यांशी संपर्क साधला जात आहे.

प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोनाची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत आहेत. त्यांचे संपूर्ण राज्यावर बारीक लक्ष आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान सुरु केले आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, एकीकडे शहरातील रूग्णसंख्या वाढत आहे. पण दुसरीकडे बरे होणाऱ्या या रूग्णांची संख्या जास्त आहे. आजपर्यंत सुमारे साडेनऊ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे रूग्ण आपला प्लाझ्मा दान करू शकतात. प्लाझ्मा थेरपी यशस्वी होत आहे. थेरपी केल्याने २० हून अधिक रूग्ण बरे झाले आहेत.

प्लाझ्मा हा अॅंटीबाॅडी व विषाणू बरोबर लढा देणाऱ्या पेशींचा समूह आहे. कोरोना होउन बऱ्या झालेल्या रूग्णांच्या रक्तावर प्रक्रिया करून त्याचे अत्यवस्थ व व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांना संक्रमण करून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे. विषाणू विरोधात लढणाऱ्या पेशी तयार करून रूग्णांना लवकरात लवकर बरे करणे हा त्याचा उद्देश आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी स्वतःचा प्लाझ्मा दान करावा. बाधित रूग्णांना जीवनदान द्यावे. हा त्यामागचा हेतू आहे. शहरातील ९ हजारहून अधिक जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान केल्यानंतर अनेकांना कोरोनावर मात करता येते. वायसीएमच्या रक्तपेढीत प्लाझ्मा घेतला जाईल. ज्या कोरोनामुक्त रूग्णाला प्लाझ्मा दान करायचा आहे. त्याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *