पिंपरी I झुंज न्यूज : जिल्हा महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या वतीने त्रीवेनीनगर शिवरकर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते २ या वेळेत जवळपास २२ रक्तदात्यांची केले.
शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस वैभव विक्रम छाजेड यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात केले होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी चिंचवड शहर व भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब चंद्रकांत थोरात यांनी केले. यावेळी सर्जेराव भोसले, नेताजी काशीद, संजय यादव, दादा ठाकरे, आबा पांचाळ, अशोक गायकवाड, संजय गाढवे, संजय रोकडे, मुकेश चौकेकर, बाळासाहेब नाखाडे, तेजेस चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संदीप आखाडे, संतोष गावडे, वैभव थोरात, चेतन सावंत, त्रिंबक पटाईत, तानाजी गायकवाड, विश्वास लिंबोरे, निलेश गाढवे, ऋषिकेश डोरले संगमेश्वर मुळे, बाळासाहेब बांदल यांनी विशेष परिश्रम घेतले.