पुणे I झुंज न्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाला लक्षात घेता व सरकारचे अटी व नियमांचे पालन करत कुणाल देशमुख दिगदर्शित “गोल्डन hour ” या सामाजिक लघु चित्रपटाचे मोशन पोस्टरचे अनावरण आनंद पिंपळकर (आनंदी वास्तू लोकप्रिय वास्तुतज्ञ) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले.
“सामाजिक तसेच वाहतुक नियमासंदर्भात विषय असल्याले “गोल्डन hour क्षण महत्वाच..” या लघु चित्रपटाचे पोस्टर अनावरण सोहळा इंस्टाग्राम लाईव्ह माध्यमातून चक्क थेटर मध्ये मोशन पोस्टर व पोस्टर प्रसिद्ध करण्यात आल. तसेच गोल्डन hour (क्षण महत्वाचं…) या नावाचे स्पष्टीकरण करून सर्वांना त्या गोष्टीचे महत्व समजून सांगण्यात आले व वाहन चालक तसेच नागरिकांना वाहतुकीचे अटी व नियम पाळावे असा संदेश लाईफ माध्यमातून देण्यात आला आहे. बऱ्याच चित्रपटाचे पोस्टर वेगवेगळ्या पद्धतीत अनावरण केले जातात. पण असे पोस्टर लॉन्चिंग पहिल्यांदाच घडलं आहे असे कुणाल देशमुख यांनी सांगितले.
यावेळी दिग्दर्शक प्रीतम एस.के पाटील, अभिनेता प्रणव आनंद पिंपळकर, अभिनेते महेश घाग यांचे योग्य मार्गदर्शन लाभले तसेच सर्व टीमला त्यांनी लाईव्ह द्वारे शुभेच्छा दिले व पोस्टर चे अनावरण केले तसेच सर्वांना कोरोना च्या काळात घरी राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
इन्स्टा लाईव्हद्वारे हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांनी दिल्या शुभेच्छा
चित्रपटाचे युवा दिग्दर्शक कुणाल देशमुख यांनी पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित करून चित्रपट व चित्रपटच्या नवा संदर्भात माहिती देऊन अचानक लोकडाऊन लागले. त्यामुळे इन्स्टा लाईव्ह करायचे ठरवले या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असे मनोगत व्यक्त केले तसेच सर्व टीमचे व सर्व मार्गदर्शक चे आभार मानले. तसेच इन्स्टा लाईव्हद्वारे हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पोस्टरला शुभेच्छा दिल्या.
निर्माते स्वानंद देव त्यांनी चित्रपटाबद्दल सामाजिक जनजागृती करण्यासाठी लघु चित्रपटची निर्मिती करायचे ठरवले असल्याचे मत स्पष्ट केले. चित्रपटातील प्रमुख बालकलाकार अर्णव कालकुंड्री, तुषार देव, शीतल पाटील, ओंकार साखरे, सुधीर भालेराव, रोहित ओव्हाळ, श्रीकृष्ण भिंगारे, पंकज किरदत्त, सागर भागवत, स्वागत काळे आदि कलाकार, तसेच डॉक्टर व विविध खात्यातील पोलिसांनी हजेरी लावली. दिग्दर्शक कुणाल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.