रजनीकांत यांना “दादासाहेब फाळके” पुरस्कार जाहीर ! ; जाणून घ्या या सुपरस्टारचा प्रवास

भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सिने अभिनेते रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. चला तर या निमित्ताने त्यानिमित्ताने रजनीकांतच्या प्रवासावर एक नजर टाकुयात..

१२ डिसेंबर १९५० ला बंगळुरूमध्ये शिवाजीराव यांचा जन्म झाला. हेच शिवाजीराव पुढे जाऊन रजनीकांत बनले.

जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या ४ मुलांतील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव.

रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर घर चालवण्यासाठी त्यांनी हमाली केली.

सुपरस्टार बनण्यापूर्वी रजनीकांत एक बस कंडक्टर म्हणून काम करत होते.

रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी त्यांचे अभिनेता बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवले. बहादूर यांनीच त्यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला सांगितले

बालचंद्र यांचा सिनेमा ‘अपूर्वा रागनगाल’ हा त्यांचा पहिला तामिळ सिनेमा होय. यात कमल हसन आणि श्रीविद्या यांच्याही भूमिका होत्या.

रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकांतून केली. त्यांनी साकारलेली दुर्योधनची भूमिका गाजली होती.

सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा नायक म्हणून ते एस. पी. मुथुरमन यांच्या ‘भुवन ओरु केल्विकुरी’ या सिनेमातून समोर आले!

‘बिल्ला’ हा त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमाय. 1978ला आलेला अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’चा तो रिमेक होता.

रजनीकांत यांनी ‘मुंदरू मूगम’ या सिनेमात तिहेरी भूमिका केली होती. यासाठी त्यांना तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

टी रामा राव यांचा ‘अंधा कानून’ हा रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रिना रॉय यांच्याही भूमिका होत्या.

१९८५ ला त्यांनी १०० सिनेमे पूर्ण केले. ‘श्री. राघवेंद्र रजनीकांत’ हा त्यांचा १०० वा सिनेमा होता.

त्यांच्या ‘राजा चायना रोजा’ या सिनेमात प्रथमच अॅनिमेशनचा वापर करण्यात आला होता.

त्यांनी तामिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगू सिनेमांसोबतच ‘भाग्य देबता’ या बंगाली सिनेमातही भूमिका साकारली आहे.

तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या सुपरस्टारला सर्वोच्च सन्मानाबद्दल “झुंज न्यूज” च्या वतीने शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *