“थेरगाव सर्वांगीण विकास” व्याख्यानमालेचे आयोजन ! ; स्विकृत नगरसेवक संदीप गाडे यांची संकल्पना

थेरगाव I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्विकृत नगरसेवक संदीप गाडे यांच्या संकल्पनेतून रविवारी (दि ७ मार्च ) रोजी संध्याकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून “थेरगाव सर्वांगीण विकास” व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात “ब्लोकेजेस् समज गैरसमज” या विषयावर नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ.अर्चना वाजगे-हांडे यांचे व्याख्यान होणार आहे.

आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असणाऱ्या अंत्यत महत्वाच्या आरोग्य या विषयावर हि व्याख्यानमाला आहे. ह्रदयरोग आणि ब्लोकेजेस् हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. ब्लोकेजेस् वर सर्रास शस्त्रक्रिया हाच उपाय सुचविला जातो. पण , नैसर्गिक उपचार पद्धती आणि व्यायाम यांच्याद्वारे आपण ब्लोकेजेस् वर मात करू शकतो आणि याच विषयावर नागरिकांशी खुला संवाद साधला जाणार आहे.

नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ.अर्चना वाजगे-हांडे या गेली १५ वर्षे हृदयरोग आणि मधुमेह यासंदर्भात माधवबाग शी संलग्न आहेत. तरी रविवार , दि.७ मार्च २०२१ संध्याकाळी ७ वाजता ,संदीप काशिनाथ गाडे यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून या व्याख्यानमालिकेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook live link –
https://fb.me/e/2nognOGy9

पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवान विस्ताराचे साक्षीदार आणि महत्त्वाचा दुवा ठरलेले गाव म्हणजे थेरगाव..!! आपले गावपण जपत थेरगावने विविध भागातून आलेल्या नागरिकांना सामावून घेतले. थेरगावची सर्वांगीण प्रगती होत असतानाच विविध विषयांवरील नामवंत लोकांची एक वैचारिक बैठक बसविण्याचा या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल. असे स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *