टीम घनगडचे स्वराज्य कार्य सुरूच ! ; गडावर बुजलेल्या भुयारी टाकी चा शोध

“ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचाय”

मुळशी I झुंज न्यूज : लोणावळामध्ये घनदाट परिसरामध्ये उभा असलेला घनगड. या किल्याचा मुख्य असा काही इतिहास नाही. पण हा गड टेहळणी बुरुज किव्हा कैदी ठेवण्यासाठी करत असत असे एका साईटवर लिहलेले आहे. “ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचाय” हे ब्रीद सोबत घेऊन मातीत गाडला गेलेला इतिहास आणि ऐतिहासिक गोष्टी प्रकाश झोतात आणण्यासाठी मुळशीतील टीम घनगडचे (स्वराज्य कार्य महा/१७११७/सा.) स्वराज्य कार्य सुरु आहे.

नुकतेच घनगड गडावर टीम कार्य करत असताना इतिहासाचा अनमोल ठेवा मातीच्या ढिगाऱ्याखाली पुर्णपणे दबुन गेल्याचे निदर्शनास आले. हे पाहून टीम मधील सदस्यांना जणू ती ऐतिहासिक वास्तु आपल्याला खुणावत होती आणि कधी एकदा माझा श्वास मोकळा करताय असं म्हणत होती. असे जाणवू लागले. ती वास्तु म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन एक भुयारी टाक आहे. हे टाक बालेकिल्ल्याचा दरवाज्याच्या डाव्या बुरुजाच्या बाजुलाच आहे. आता पर्यंत कोणाच्याही निदर्शनास न आलेले असे पाण्याची टाकी आहे. यांची निर्मिती कधी व कोणी केली हे सांगता येवु शकत नाही. पण हे स्थापत्यशास्राचा अचुक असा नमुना आहे. असे टीम मधील नितेश खाणेकर यांनी सांगितले.

टाक्यांचे संवर्धन करण्यापूर्वी येथे टाक आहे असे कोणालाच निदर्शनास आले नाही. टिम घनगडचे नितेशदादा याना या वास्तुच्या दोन पायऱ्या दिसल्या संवर्धन करण्याचे मनाशी बाळगुन दिनाकं ७/२/२०२१ रोजी झालेल्या संवर्धन मोहीम हे काम करण्याचे योजिले. त्या नंतर टिम घनगड मधील सदस्यांनी त्या पाण्याच्या टाकीला नवनवीन संजीवनी देण्याचा एक छोटासा प्रयत्न टिमच्या सदस्यांनी केला. या टाकीची लांबी १० बाय २० ची असु शकते असा अंदाज आहे.

हि मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी सागर कदम, गणेश खाणेकर, आदित्य साठे, वैभव खाणेकर, सचिन गोडांबे, सदानंद मालपोटे, अमित खेंगरे, रुपेश केंगार, संग्राम वाबळे, तुषार गोरुळे, संदिप बोडके व बाकी टीम चे सदस्य सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *