ताथवडे I झुंज न्यूज : ताथवडे येथील पवार परिवारातर्फे दरवर्षी घेण्यात येणारा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम यंदा साध्या पध्दतीने साजरा करत कार्यक्रमासाठी होणार वाढीव खर्च टाळुन मामुर्डी येथील माई बाल भवनात अन्न धान्य व खाद्यपदार्थ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन माधुरी पवार यांनी केले होते. यावेळी कांताबाई पवार, संजीवनी पवार , मिरा पवार, शोभा पवार, शितल पवार व इतर पवार परिवारातील सदस्य आणि माई बाल भवन संस्था चालक प्रविण देशंपाडे उपस्थित होते.
यावेळी पवार परिवार ने सांगितले की आशा समाजिक कार्यकमासाठी होणारा खर्च टाळुन समाजामध्ये अनाथ, अंध, अपंग लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थाना मदतीचा हात द्या. आपण पण समाजासाठी काही तरी देने लागतो या भावनेतुन समाजासाठी काम करा.