घरासमोरुन चोरट्यांनी चारचाकी लांबवली ; हिंगणघाट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

हिंगणघाट | झुंज न्यूज : स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी अतुल महादेवराव देवढे यांची मारोती स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.२१) रोजी सकाळी उघड़किस आली.

कारमालक अतुल देवढे यांनी घरचे सीसी टिव्ही तपासले असता दोन इसम कार चोरतांना आढळले असून पोलिसांना मात्र आरोपी शोधण्यात अद्याप यश आले नाही.

कारमालक शिक्षक म्हणून नोकरी करीत असून गेल्या संत तुकडोजी वार्ड येथील तांबुलकर ले-आऊट येथे कुटुंबासह राहतात, त्यांनी पांढऱ्या रंगाची मारोती स्विफ्ट डिजायर कार क्रमांक एम एच- ३२ वाय २९७० आहे. हि गाडी मी सेवा मारोती शोरून वर्धा येथुन २०१५ ला सुमारे ८ लाख १६ हजार रुपये किंमतीला खरेदी केली होती.

   गुरुवारी सकाळी देवढे कुटुंबिय जागे होताच कार दिसली नाही. म्हणून त्यांनी आपले घराचे सी.सी.टी.व्ही फुटेज बघीतले, त्यात पहाटेच्यावेळी त्यांना दोन अनोळखी इसमांनी स्वीफ्ट गाडी लांबविल्याचे लक्षात आले. सदर कारमधे गाडीचे मुळ कागदपत्रे, तसेच शिक्षक देवढे यांचे पत्नीची वैद्यकीय उपचाराची फ़ाइल तसेच शाळेसंबंधी महत्वाची कागदपत्रेसुद्धा गाडीतच असल्याने चोरी गेली आहेत. तात्काळ देवढे यांनी घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत नोंद केली.

फिर्यादिचे तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार संपत चव्हाण हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *