थेरगाव सोशल फाऊंडेशनकडून लोहगडावर स्वछता मोहीम ; नव वर्षात सदस्य पुन्हा सज्ज !

थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव सोशल फाउंडेशनकडून पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील मळवली येथील शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर स्वच्छता मोहीम राबवत नव वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. गड संवर्धन मोहिमेअंतर्गत सदस्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

या मोहिमेत अनिकेत प्रभू, निलेश पिंगळे, राहुल सरवदे, अनिल घोडेकर, प्रवीण स्वामी, मयूर कांबळे, स्वप्नील मंडल, महेश येळवंडे, गणेश डांगे, संकेत गाढवे, सचिन क्षीरसागर, शेखर गांगर्डे, यश कुदळे, अमोल शिंदे, संदेश सोनवणे आणि प्रतीक पाटील हे सदस्य सहभागी झाले होते.

लोहगडावर तसेच गडाच्या वाटेवर प्लास्टिक गोळा करून स्वच्छतेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच नव्या वर्षात थेरगावातील नागरिकांच्या प्रश्नावर लक्ष घालण्यासाठी “स्वच्छता- सुंदरता-जागरुकता” या ब्रिदवाक्यासह थेरगाव सोशल फाउंडेशन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे !

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले शेकडो वर्षांनीसुद्धा ताठ मानेने अभेद्यपणे उभे आहेत. ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणा यामुळे अनेक गडकिल्ले असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित आणि स्वच्छ करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचेच असते. त्यामुळे थेरगाव परिसरातील समस्यांचे निराकरण करतच, दुर्ग संवर्धनहि सुरु राहणार असल्याचे थेरगाव फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *