‘लॉकडाऊन लग्न’ हा गमतीदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस ! ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी शुभारंभ

पुणे | झुंज न्यूज : निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे आणि गौरी सागर पाठक यांच्या डॉक्टर डॉक्टर चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘लॉकडाऊन लग्न’ या नव्या चित्रपटाचा शुभारंभ पुण्याच्या जागृत देवस्थानात म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्याच्या तयारीस लागला आहे .

लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत. या शिवाय या लग्नकथेला खरा साज चढवलाय तो ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटातील गाण्यांनी. लॉक डाऊन मधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला आहे.

निर्माता किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक सह निर्माता हर्षवर्धन भरत गायकवाड यांचाही निर्मिती क्षेत्रात वाटा आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून चित्रपटात बऱ्याच दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे परंतु तूर्तास या चित्रपटातील कलाकार अजूनही गुलदस्त्यात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *