पिंपरी | झुंज न्यूज : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य आणि भारतीय जैन संघटना-पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर केशवजी घोळवे आणि “ब” प्रभाग अध्यक्ष सुरेशशेठ भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, नगरसेवक राजाभाऊ गावडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे,नगरसेवक विठ्ठल भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,सामाजिक कार्यकर्ते निलेश डोके, तसेच पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे, शुभम चिंचवडे, सरचिटणीस सागर म्हस्के, पुणे जिल्हा संघटक विनेश भोजे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विरेश छाजेड, सचिव अतुल बोरा, हवेली तालुका अध्यक्ष सागर पाचार्णे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाग्यदेव घुले, भोसरी विधानसभा अध्यक्ष योगेश चोरडिया, रूषि वारे आदि उपस्थित होते.