सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते विकास जगधने यांचा वाढदिवस साजरा ; “वसुंधरा वृद्धाश्रमात” जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वाकड I झुंज न्यूज : मित्रांना पार्टी देणं, मोठमोठे समारंभ, जेवणावळी यावर मोठया प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन वाकड येथील समाजसेवक युवा नेते विकास जगधने यांनी किवळे येथील “वसुंधरा वृद्धाश्रमात” जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आपला वाढदिवस साध्य पद्धतीने साजरा केला. त्यामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत “विकास जगधने युवामंच” यांच्या वतीने किवळे येथील “वसुंधरा वृद्धाश्रमात” जीवनावश्यक वस्तु , खाद्य पदार्थ व फळवाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

“पाश्चात्त्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे. वाढदिवस म्हटला की वायफट खर्च करणे हि आजच्या तरुणांची क्रेज झाली आहे. याच गोष्टी बदलत आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी जपणेही गरजेचे आहे. असे यावेळी विकास जगधने यांनी सांगितले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *