पिपरी | झुंज न्यूज : दिल्ली आंदोलनातील शेतकरी भाडोत्री असून चिन व पाकिस्तान आर्थिक रसद पूरवते अशी बेजबाबदार विधाने करून करोडो आंदोलक शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळून अपमान करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजीपाल्याची माळ देऊन निषेध करत शेतकरी जिंदाबाद,जय जवान. जय किसान घोषना देत उपमहापौर कार्यालय दणाणून सोडले.
यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , नगरसेवक मयूर कलाटे , पंकज भालेराव आदिंसह युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक यूवा नेते उपस्थित होते. गाजर मूळा, कार्ले, कांदे , बटाटे लिंबू , वांगी अशा विविध प्रकारची भाजीपाल्याची माळ उपमहापौर घोळवे यांना देण्यासाठी आणली परंतू घोळवे आपल्या कॅबीनमधून बाहेर येत नाही पाहून कार्यकर्त्यांनी कॅबीनच्या दिसेने धाव घेतली. एवढ्यात भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यानी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढली.
उपमहापौरांनी माळ स्विकारून आंदोलक शेतकऱ्यांची माफी मागावी यावर कार्यकर्ते ठाम होते. अखेर उपमहापौरांच्या खुर्चीला भाजीपाल्याची माळ घालून निषेध व्यक्त केला.