पिंपरी I झुंज न्यूज : संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सांगवी येथे उत्साहात संपन्न झाली. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत या आयोजित स्पर्धेमध्ये ३५ संघांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड शहर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पप्पू शेठ घोरपडे आळंदी पसायदान या संघाने विजय मिळविला. ४१ हजार रुपये व ट्रॉफी हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. मियाजी इलेव्हन पुणे हा संघ उपविजेता ठरला. या संघाला ३१ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तिसरा क्रमांक साई समर्थ धानोरे (२१ हजार रुपये व ट्रॉफी) व चतुर्थ क्रमांक अँथोनी फ्रान्सिस पिंपरी (११ हजार रुपये व ट्रॉफी) या संघाने मिळवला. सांगवी पोलिस संघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पिंपरी-चिंचवड या प्रेक्षणीय सामन्याचे आयोजन करण्यात आले. रंगतदार झालेल्या या सामन्यात पत्रकार संघ विजयी झाला. पंच म्हणून सुशांत म्हात्रे, संजय बाराते आणि मेहबूब शेख यांनी काम पाहिले तर सामन्यांचे समालोचन उत्तम सावंत यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सनी कसबे, रोहित पाटील,दीपेश पाटील, सुरज जाधव, वैभव वैरागर यांनी सहकार्य केले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयचे अप्पर पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन साठे, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे विधी अधिकारी प्रसाद सांगळे, उद्योगपती विश्वास दळवी, माजी नगरसेवक शंकर जगताप, भोसरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तसेच डॅनियल अँथोनी,पास्टर म्हात्रे. यांच्या शुभहस्ते बक्षिस समारंभ पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार नेते दिनकर इंगळे, रमेश दादा बागवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेषराव कसबे, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सचिव कृष्णराव गिरे, पास्टर मार्क वरप्रसाद, पिंपरी-चिंचवड शहर सेवादलाचे माजी अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, गौरव चौधरी, रोहित शेळके, विवेक भट, स्नेहल गायकवाड, उद्योगपती अरुण पवार, प्रदीप डावरे, डेव्हिड काळे, अमोल करडक, संदीप गायकवाड, प्रशांत बनकर, डॅनियल दळवी, स्नेहल डोंगरदिवे, कुशल सोज्वळ, हानोक पुजार, रोहित पाटोळे, अभिषेक कुवर, मीखाएल गायकवाड, सुमीत बोर्डे, अनिल आंग्रे, आशीष पंडीत, संदेश चोपडे, प्रनीता बोर्डे, भक्ती बोर्डे, सलोमी तोरणे, मोनीका तेलोरे, रोझी खरात, आदी मान्यवर उपस्थित होते.