जुन्नर | झुंज न्यूज : आपल्याच लग्नात, मेरा सैय्या सुपरस्टार या गाण्यावर सूपर डांस करत नवरीने नवरदेवास सरप्राईज दिले तर उपस्थित वराडी मंडळींचे चांगलेच मणोरंजन करत सर्वच सैराट झाले. जून्नर तालुक्यातील असाच एक लग्न सोहळा निरगूडे गावचे ताजने कूटूंबाची सूकन्या
श्वेता आणि उदापूरच्या शिंदे कूटूंबाचे सूपूत्र संकेत यांचा विवाह कोरोनाच्या पार्श्वभूमी वर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मात्र हा सोहळा एवढा अफलातून गाजला कि व्हाटसएप, फेसबूक, यू ट्यूब सर्वत्र सोशल मिडिया वर प्रचंड वायरल झाला. महाराष्ट्रभर चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली हे वधू-वर नेमके कोन व कुठले आहेत.
सामान्य कुटुंबातील आणि तेही स्वतःच्याच लग्नात नवरीने डांस करने तसे कुणालाही न पटणारा विषय आहे. आपल्याला लोक नाव ठेवतिल होणारा नवरा काय म्हणेल, सासू सासरे ईतर नातेवाईक काय म्हणतील हा विचारही मनात न ठेवता मंडपाच्या द्वारावरून जोडीने वाजंत्री वाजत गाजत स्टेजवर घेऊन जातात हि प्रथा सर्वत्र आहे. परंतू ईथे वधूने वर राजाला एकटेच पूढे जाण्याची विनंती केली वर राजा स्टेजवर पोहचले आणि ही गमंत फक्त वधू आणि तिचा लहान दिर यांनी ठरवून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे दिराने मेरा सैय्या सुपरस्टारया गाण्याची कॅसेट लावली आणि वधूने डांस करत स्टेज प्रवेश केला वर राजाने आश्चर्य चकित होऊन कौतुकाने दोन्ही हाताचा आधार देत स्टेजवर घेतले. या वेळी सर्व वराडी मंडळींसूध्दा सैराट झाल्याचे पहायला मिळाले.