बीड परभणी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन ; मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर निर्घृण हत्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत झालेला मृत्यू (हत्या), पुणे जिल्यातील राजगुरूनगर येथे भटक्या विमुक्त समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार करून करण्यात आलेल्या हत्या राज्यभर अनेक ठिकाणी राजकीय वरदहस्ताने होत असलेले खंडणीचे गुन्हे तसेच अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होत असलेले बलात्कार विनयभंग यासारखे गुन्हे यामुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहे या वातावरणामुळे राज्यात शैक्षणिक आर्थिकऔद्योगिक विकास होण्यास अडचण निर्माण झाली आहे राजकीय वरदहस्तामुळे जिल्ह्या जिल्ह्यात गुंडाच्या टोळ्या तयार झाल्या आहेत याचा निषेध करण्यासाठी गुरुवार ( दि.९) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा राजकीय पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने शहर तहसीलदार कार्यालय निगडी येथे जन आक्रोश धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांच्या वतीने मागण्या करण्यात आल्या. – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना त्यांच्या सूत्रधारासह अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी. कै संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व घटनेचे साक्षीदार यांना पोलीस संरक्षण द्यावे. या प्रकरणातील आरोपीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचेशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे प्रसार माध्यमातून उघड झाले आहे म्हणून या हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.
खंडणीच्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांशी संबंध असल्यामुळे खंडणीचा आरोपी वाल्मिक कराड यास सरपंच देशमुख खून प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात यावे तसेच गुंडगीरीतून आरोपींनी कमावलेल्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. परभणी येथील कोठडीत झालेली सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या (मृत्यू ) या प्रकणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी तसेच दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. राजगुरूनगर येथे झालेले अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार व हत्या तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घडलेल्या अप्रिय घटनांबाबत आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी. महाराष्ट्रातील एकूणच कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून परिस्थिती गंभीर बनली आहे यात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याला निष्पक्ष निर्भीड राजकीय हस्तक्षेप जुगारणारा गृह विभागासाठी पूर्णवेळ देणाऱ्या ग्रहमंत्र्याची आवश्यकता आहे तरी महाराष्ट्राच्या हितासाठी नागरिकांच्या कल्याणासाठी फडवणीस यांनी गृहमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि नवीन गृहमंत्री नियुक्त करावेत. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे तहसिलदार जयराज देशमुख यांचे मार्फत आंदोलकांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मानव कांबळे, प्रकाश जाधव, संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मारूती भापकर, नरेंद्र बनसोडे, शिवशंकर उबाळे, सोमनाथ शेळके, मीना जावळे, प्रताप गुरव, मुकुंद किर्दत संजीवनी पुराणिक, शामराव वीटकर, सुनिता शिंदे, कल्पना गिडडे, शैलजा चौधरी, अजय भोसले, बापू गायकवाड, राजन नायर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
जीवन बोराडे यांनी आभार मानले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, प्रदीप पवार, अरुण पवार विश्वनाथ जगताप, गणेश देवराम ,विशाल मिठे, विष्णू मांजरे, जयंत गायकवाड, नकुल भोईर ,संजय जाधव, शहाजी कारकर, शशिकांत औटी, महेश कांबळे, रविंद्र चव्हाण, शांताराम खुडे, संतोषराजे निंबाळकर, संपतराव जगताप, वसंत पाटील इत्यादी मान्यवरांसह हजारो आंदोलक उपस्थित होते.
“बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी व कार्यकर्ते आहेत योग्य व निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी… – संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांची मागणी.
“बीड हत्या प्रकरण परभणी कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणी राजगुरूनगर अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार व हत्या प्रकरण यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागावरील नियंत्रण सुटल्याचे दिसून येते धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा वाल्मिक कराड ला सरपंच देशमुख हत्येत आरोपी करावे…- जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे.
“मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदावरून मुक्त व्हावे. राज्याला निष्पक्ष बिगर राजकीय निर्भीड कठोर प्रशासक असलेला पूर्ण वेळ गृहमंत्री नियुक्त करावा…. – मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांची भूमिका