पेरिविंकल च्या पौड शाखेत नॅशनल मॅथेमॅटीक्स डे उत्साहात साजरा…

पुणे I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड शाखेत नॅशनल गणित दिनाचे औचित्य साधून प्रायमरी व सेकंडरी विभागातील विदयार्थी व शिक्षकवृंद यांच्या कडून आज नॅशनल मॅथेमॅटीक्स डे अत्यंत उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला.

गणित दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सांख्यिकी खेळ, फ्लो चार्ट्स, वर्किंग मॉडेल्स बनवून विविध प्रकारे गणिती उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाची माहिती व संदर्भासहित स्पष्टीकरण देवून सर्वाँना सांगितली. यामुळे अनेक संखिक मॉडेल्स बघायला मिळाले व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती ला दाद देवून सोप्या पद्धती ने गणित विषय सादर करण्यासाठी वाव मिळाला. विद्यार्थ्यांची गणित विषयाची भिती जाऊन त्यांना गणित या विषयाची गोडी वाढवण्यास मदत व्हावी या हेतूने आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय गणित दिन 2024 चा तपशीलवार अभ्यास केला पाहिजे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मांडले. आजचा दिवस हा डिसेंबरमधील महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रीय गणित दिवस हा 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 2012 पासून, राष्ट्रीय गणित दिवस देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये आयोजित केलेल्या असंख्य शैक्षणिक कार्यक्रमांसह साजरा केला जात आहे. त्यालाच उजाळा देत पेरीविंकल च्या पौड शाखेतील विद्यार्थ्यांनी देखील एक आगळा वेगळा उपक्रम आज सादर केला. कार्यक्रमाचा प्रारंभ सांख्यिकी गायनाने करण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व विदयार्थी व शिक्षकांनी वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सर्व विदयार्थी नक्कीच गणिततज्ञ होउन शाळेचे नाव उज्वल करुन पौड शाखाही युनिव्हर्सिटी कडे झेप घेण्यासाठी सज्ज होत असल्याची ग्वाही आज या गणित दिनाचे औचित्य साधून दिली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेन्द्र बांदल सर,संचालिका रेखा बांदल व डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या नियोजनाने इन्चार्ज प्राजक्ता वाघवले, गणित शिक्षक पौर्णिमा उबाळे व संध्या देशमुख आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे इयत्ता ७ वी च्या श्रेयसी जाधव व संस्कृती पिंगळे या विद्यार्थिनींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *