२६/११ मुंबई आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वतीने श्रद्धांजली…

शेवगाव I झुंज न्यूज : महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव च्या वतीने मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रध्दांजली अर्पण करून सर्व पोलीस कर्मचारी माजी सैनिक यांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद मानन्यात आले.

महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल दुबाले, राज्य सचिव योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी समाधान नागरे (पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, पोलीस उपनिरीक्षक लहाने, पो.कॉ सागरदादा मोहिते, माजी सैनिक सेवा संघचे सर्व पदाधिकारी विनोद शेळके, शिवाजी बडे, भक्तराज केदार, भगवान खेडकर, रुस्तुम रूईकर, सुरेश आव्हाड, भाऊसाहेब पालवे, नानासाहेब पायघन, काकासाहेब काळे, पाटील मेजर, मेजर भाऊसाहेब शिंदे, व‌ राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे सर्व विद्यार्थी तसेच, सामाजिक कार्यकर्ते बंडुभाऊ रासने, डॉ अमोल फडके, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष दिपक मोहिते शेवगाव तालुका प्रमुख तथा पोलीस प्रोटेक्शन अधिकारी विकास शेलार लोक स्तंभ न्यूज मुख्य संपादक नंदकिशोर मोहिते लोक स्तंभ न्यूज अ.नगर प्रतिनिधी मधुकर मोहिते राक्षी शाखा प्रमुख दिलीप जगधने उपप्रमुख विठ्ठल भोरजे, पप्पू गोरे, सागर मोहिते, आदित्य निकाळजे, सनी मोहिते, शिवाजी उर्किडे अंकुश गव्हाणे व शेवगाव पोलीस स्टेशन सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *