जाणून घ्या, किती झाले मतदान अन् आकडेवारी कुठे जुळली नाही ?
पुणे I झुंज न्यूज : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. निकालाच्या आकडेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, तब्बल ९५ मतदार संघात मतदान केंद्रात झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात मोठी तफावत असल्याचं आढळलं आहे. तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते. दरम्यान, यावरून विरोधक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले. या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ केला. यात भाजपने तब्बल १३२ जागांवर यश मिळवलं आहे. निवडणूक निकाल हाती येताच संजय राऊत यांनी या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यात विरोधी वातावरण असतांना देखील असे निकाल येणे धक्कादायक असल्याचं राऊत म्हणाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार ९५ मतदार संघात प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधी मतदान यात तफावत असल्याचं आढळलं आहे. तर १९ मतदार संघात ईव्हीएममध्ये जास्तीची मते आढळली आहे. तर ७६ मतदार संघात ईव्हीएममध्ये कमी मतदान आढळले आहे. तर बुध पातळीवरील तपासणीत तफावत असल्याचं आढळलं आहे. तर १९३ मतदार संघात झालेले प्रत्यक्ष मतदान व ईव्हीएममधील आकडे यात कोणतीही तफावत आढळली नाही.
- या मतदारसंघात कमी मते
अक्कलकुवा, पाथरी, आंबेगाव,,नवापूर, घनसावंगी, शिरूर,साक्री, बदनापूर, इंदापूर,,शिरपूर, औरंगाबाद पश्चिम, बारामती,चोपडा, गाणगापूर, मावळ,भुसावळ, नांदगाव, कोथरूड, जळगाव शहर, मालेगाव बाह्य, खडकवासला,चाळीसगाव, बागलाण, पुणे कॉन्टन्मेंट,पाचोरा, सिन्नर, कोपरगाव,जामनेर ,निफाड ,शेवगाव,अकोट, नालासोपारा, लातूर ग्रामीण, अकोला पश्चिम, वसई, लातूर शहर, मोर्शी, भिवंडी पश्चिम, अहमदपूर, वर्धा, कल्याण पश्चिम, औसा,सावनेर, कल्याण ग्रामीण, तुळजापूर,नागपूर मध्य, अंबरनाथ, माढा, नागपूर पश्चिम, मीरा भाईंदर, सोलापूर शहर मध्य,कामठी, ओवळा, माजिवडा, कोल्हापूर उत्तर,आरमोरी, कोपरी, पाचपाखाडी, खानापूर,अहेरी, दिंडोशी,बल्लारपूर, चारकोप, चिमूर, विलेपार्ले,वणी, चांदिवली,नांदेड दक्षिण, सायन, कोळीवाडा, मुखेड, मुंबादेवी, कळमनुरी, पनवेल,जिंतूर, कर्जत, गंगाखेड, अलिबाग - या मतदारसंघात जास्त मते
आमगाव, मालेगाव मध्य, करमाळा, उमरखेड, कळवण, सोलापूर दक्षिण, लोहा, चांदवड, कागल, देगलूर, दिंडोरी, कोल्हापूर दक्षिण,हिंगोली, बोईसर, हातकणंगले, औरंगाबाद पूर्व, भोसरी, वैजापूर, परळी - मतदान विरुद्ध मतमोजणी
९५ मतदारसंघात तफावत
१९ मतदारसंघातील EVM मध्ये जास्त मते आढळली
७६ मतदारसंघातील EVM मध्ये कमी मते आढळली
बूथ पातळीवरील (Form 20) तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या आणखी वाढू शकते.
१९३ मतदारसंघात फरक नाही, याठिकाणी मतदान आणि मतमोजणीत एकसारखीच मते आहेत. ईव्हीएम आकडेवारीतही फरक नाही.