आगामी काळात भोसरी विधानसभेत कायदा सुव्यवस्था दिसेल- अजित गव्हाणे

-पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार, ॲडव्होकेट असोसिएशन आणि लीगल सेलचा अजित गव्हाणे यांना पाठिंबा

-वकील बांधवांच्या माध्यमातून शहरात संविधानाची सक्षमपणे अंमलबजावणी होणार- अजित गव्हाणे

भोसरी I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांना मानते. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानावर चालणारे कायद्याचे राज्य आपल्याला हवे आहेत. वकील बांधवांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था मानणारा,भयमुक्त व शाश्वत विकासाचा चेहरा असलेले पिंपरी चिंचवड आगामी काळात घडवायचे आहे असा विश्वास माविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वकील बांधवांच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे शनिवारी (दि.16)आयोजन करण्यात आले. यमुनानगर येथील सीझन बँक्वेट हॉल येथे हा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लीगल सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुहास पडवळ, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार व ॲडव्होकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, ॲड. नारायण रसाळ, ॲड. सुदाम साने ॲड. किरण पवार, ॲड. मदन छाजेड, ॲड. सुनील कडुसकर, ॲड. प्रमिला गाडे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ ॲड. राजेंद्र अनुभुले यांनी गुन्हेगारी कायद्यांवर घटनेचा प्रभाव ;घटनात्मक आणि न्यायिक चर्चा या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहरातील वकील बांधवांशी संवाद साधला. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानावर चालणारे कायद्याचे राज्य आणायचे आहे. शहरातील वकील बांधवांच्या माध्यमातून शहराला भयमुक्त व शाश्वत विकासाचा चेहरा द्यायचा आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीतून या शहरात सुराज्य पुन्हा एकदा स्थापित करायचे आहे. यावेळी अजित गव्हाणे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वकील बांधवांच्या समस्या समजावून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन पिंपरी चिंचवड एडवोकेट बार, एडवोकेट असोसिएशन आणि लीगल सेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना -लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे यांनी केली.सूत्रसंचालन ऍड. किरण पवार, ॲड. प्रभा तरस यांनी केले व आभार ॲड. अमोल गव्हाणे यांनी मानले. संयोजन समितीमध्ये ॲड. गजेंद्र तायडे ॲड. श्रद्धा मंचरकर ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. संघर्ष सूर्यवंशी, ॲड. मिलिंद कांबळे ॲड. राजेश रणपिसे व इतर लीगल सेल पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *