काळेवाडीत जुगार अड्यावर पोलिसांचा छापा ; वाकड पोलिसांची धडक कारवाई

वाकड I झुंज न्यूज : काळेवाडीत श्रीनगर येथे असलेल्या जुगार मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनलक्ष्मी नावाच्या पानटपरी मध्ये तसेच टपरीच्या पाठीमागे विशाल जुन्नर बँकचे समोर लोखंडी पत्र्याचे बंदिस्त शेडमध्ये अवैधरित्या जुगार मटका खेळणाऱ्या २० ते ३० जणांवर वाकड पोलीसांनी कारवाई केली.

वाकड पोलिसांनी आरोपींकडून ४७ हजार १७० रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याबाबत सुनिल जगन्नाथ सिरसाठ पोलीस हवालदार सामाजिक सुरक्षा पथक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, संदिप किसन तरई ( वय ३८ वर्षे , रा . मातोश्री निवास शिवशंभो कॉलनी , श्रीनगर , बरगाव रोड , रहाटणी , पुणे ( चालक – मालक ) गजेंद्र शिवाजी इडले , (वय ३५ वर्षे , रा वराळे फाटा भोंगाडे कॉलनी , राम नं .०८ , तळेगाव दाभाडे ) सतिश वसंत कांबळे ( वय १४ वर्षे , रा . जयमल्हार नगर , कॉलनी नं . ६ साने गुरुजी शाळेजवळ , थेरगाव पुणे ) सनिशा रसाळ (वय १ ९ वर्षे , रा बेयोन इंग्लिश मिडियम स्कूल समोर , स्वास्तिन कॉलनी , तापकीरनगर , काळेवाडी ) संतोष सुभाष गिरी (वय २४ वर्ष रा जयमल्लार नगर गल्ली नं ०४ बोरगाव , पुणे) अमर भिमराव गाडे (वय ३३ वर्ष , रा ६/१ वारणेचाळ , कैलासनगर , बोरगाव , पुणे ) विनय शंकर शिंदे ( वय ३४ वर्ष ३४ वर्ष रा जयमल्हार नगर , म.न. ०५ माताश्री निवास , बेरगाव ) मोहन नरसिंग कनामे ( वय ३१ व रा . गुरुनानक नगर बेरमाय ) सुनिल विश्वनाथ ठाकुर (वय २५ वर्ष , रा.श्रीनगर , जयमल्हार कॉलनी , थेरगाव ) विजय राहुल तलवारे (वय ११ वर्षे रा श्रीनगर , थेरगाव , पुणे . व इतर 19 जणांना सीआरपीसी ४३ ( अ ) ( १ ) प्रमाणे नोटीस देवुन सोडले आहे.

“पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तीन वाजण्याच्या सुमारास काळेवाडीतील श्रीनगर येथील धनलक्ष्मी नावाच्या पानटपरी मध्ये तसेच टपरीच्या पाठीमागे विशाल जुन्नर बँकचे समोर लोखंडी पत्र्याचे बंदिस्त शेडमध्ये अवैधरित्या जुगार मटका सुरु असल्याबाबत माहिती भेटली होती. त्यानुसार पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. यावेळी खेळणाऱ्या चालक मालक अशा एकून २० ते ३० जणांवर कारवाई करण्यात आली. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *