समस्या सोडवणारा आमदार निवडा – विलास लांडे

अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचे आवाहन

भोसरी I झुंज न्यूज : भोसरी मतदार संघातील तमाम सोसायटी धारकांच्या समस्या आम्हाला माहित आहेत . प्रत्येक सोसायटीत काही ना काही समस्या आहेत . त्या समस्या आपण स्थानिक लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचवल्या असतील , पण ते आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी आले , याची मला जाणीव आहे , म्हणूनच यावेळी तुम्हाला , तुमच्या समस्या सोडवणारा आमदार निवडावा लागणार आहे.

यावेळी भोसरी विधानसभेत एक सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून अजित गव्हाणे यांच्या तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून त्याना प्रचंड मताधिक्य द्या असे आवाहन भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी चर्होली येथे बोलताना केले. ते आज चर्होली येथील विविध सोसायटी धारकांशी संवाद साधत होते .

 यावेळी बोलताना म्हणाले की , भोसरी विधानसभा क्षेत्रातील जवळपास सर्वच सोसायटी मध्ये समस्या आहेत . कुठे पाणी समस्या , वीज , गार्डन , बिल्डरने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे ,आपण पैसे देऊन अडचणीत आलेले असता , त्यामुळे बिल्डरांच्या मनमानीचे शिकार होतो , अशा बिल्डरांना कायद्याचेही भान राहिले नाही . शिवाय अशा बिल्डरांना स्थानिक गुंड लोकप्रतिनिधींचे पाठबळ लाभलेले असते , त्यावेळी ते कोणाचेच ऐकत नाहीत . अशा अनेक समस्यांमुळे फ्ल्याट धारक पैसे देऊन अडचणीत आहेत . त्याना लागणारी मदत कोणीच केली नाही व करणार नाही . कारण त्याना मदत करण्या ऐवजी स्वतःची कमाई कशी करता येईल याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले होते . त्याना तुमच्याशी काहीही देणे घेणे नाही हाच प्रकार चर्होलीत सुद्धा पहावयास मिळतो . पण ते आता तुमच्याकडे मते मागायला येतील , त्याना स्पष्टपणे सांगा , ‘ आमच ठरलय … . ‘ त्याना थेट घरचा रस्ता दाखवा आणि एक सुज्ञ , सुसंस्कारित व उच्च शिक्षित उमेदवार म्हणून समोर आलेले अजित गव्हाणे याना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी ठिकठिकाणच्या सोसायटी मध्ये बोलताना केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *