भोसरीतील विरोधकांची अवस्था म्हणजे ‘दिवा विझतानाची फडफड’ !

  • महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांची सडकून टीका

भोसरी I झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधकांची अवस्था अगदी केविलवाणी झाली आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही विषय राहिलेले नाहीत. त्यामुळे ते बेसुर झाले आहेत. सत्ताधारी आमदारांवर आरोप करण्यासाठी कोणताही विषय ठोस नाही. म्हणून बॅनर लावून टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “दिवा विझताना जशी फडफड होते” अगदी तशीच विरोधकांची अवस्था झाली असल्याची टीका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांकडून करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने महायुती तर्फे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपनेते इरफान सय्यद, संभाजी शिरसाठ, मनीषा फुंदे, उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, संदीप क्षीरसागर ,सागर पाचारणे, रोहित जगताप , दत्ता आवराळे , संदीप जाधव, जान्हवी पवार आदी उपस्थित होते.

या निर्धार मेळाव्यात बोलताना उपजिल्हाप्रमुख भगवान पोखरकर म्हणाले की, कामाच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी मतदारसंघाला एका सूत्रात बांधले आहे. मतदारांना विकासाच्या बाबतीत आपले भलेबूरे चांगलेच कळते. विरोधकांच्या खोट्या गप्पांना मतदान भुलणार नाहीत.

उपनेते इरफान सय्यद म्हणाले विरोधकांना दहा वर्षानंतर आरोप करायचे शहाणपण सुचले आहे. विरोधाला विरोध हे एकच सूत्र विरोधकांचे आहे. पण, मतदार सुज्ञ आहेत. आपल्या हाकेला धावणारे नेतृत्व कोणते हे मतदारांना आता चांगलेच कळते. गेली वीस वर्ष अनेक सुविधांसाठी आपण प्रतीक्षेत होतो. त्या सुविधा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दहा वर्षात आपल्याला उपलब्ध झाल्या. यामध्ये न्यायालय संकुल, इंजीनियरिंग कॉलेज, संतपीठ, नामांकित शैक्षणिक संस्था अशी अनेक उदाहरणे देता येतील. अनेक शासकीय योजना आपले सरकार राबवत आहे. त्या शासकीय योजना मतदारसंघातील माता-भगिनी युवक यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याचा देखील पाठपुरावा लांडगे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झाला आहे.

संदीप शिरसाठ म्हणाले की, विरोधकांचे आरोप म्हणजे दिवा विझताना होणारी फडफड आहे. विरोधकांना जेव्हा बोलण्यासारखे काही नसते त्यावेळी खोटे आरोप केले जातात. हे भोसरी मतदारसंघांमध्ये पहिल्यानंतर स्पष्ट जाणवते. 2004 मध्ये मी रोजगारासाठी या शहरात आलो होतो. त्यानंतर उत्तरोत्तर मी प्रगती केली. मला कुठेही या मतदारसंघात दडपशाही जाणवली नाही. माझ्यासारख्या बाहेरून आलेल्या माणसाला जर या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरक्षित वाटत असेल तर जे येथील स्थानिक आहे त्यांनाच कुठून दडपशाही दिसून येते, मला हेच कळत नाही. 288 मतदारसंघ महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यापैकी एकमेव भोसरी मतदारसंघ असेल जिथे विरोधकांना खोट्या आरोपांचे बॅनर लावून प्रचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्पष्ट जाणवते की विरोधकांची अवस्था अगदी केविलवाणी झालेली आहे.

गडी रांगडा पण मनानं हळवा..!
शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये उपनेते इरफान सय्यद म्हणाले “गडी पैलवान ,दिसायला रांगडा” असे आमदार महेश लांडगे यांचे व्यक्तिमत्व आहे. पण आमदार मनानं अगदी हळवे आहेत. स्वच्छ चारित्र्याचे आहेत. महिला सक्षमीकरण आणि त्यांची सुरक्षा असा अजेंडा घेऊन ते काम करत आहे. त्यामुळे शहरातील माता भगिनी आपला पाठीराखा म्हणून त्यांच्याकडे पाहतात.हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन त्यांनी एका विचाराने आपली वाटचाल सुरू केली. म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत..शिवसैनिक विचाराने पक्के असतात.एकदा आदेश आला की ते मागेपुढे पाहत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या विचारांचे सरकार आणण्यासाठी आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी उभे राहून एकजुटीने काम करणार आहोत.

“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यतील असामान्य नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून शिवसैनिक चांगल्या प्रकारे काम करत आहे. या शिवसैनिकांच्या सोबतीने भोसरी मतदारसंघांमध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या योजना भविष्यामध्ये आपल्याला आणायच्या आहेत. मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने एका उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. शाश्वत विकासाचे स्वप्न आपण नक्कीच सोबतीने पूर्ण करू. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *