पिंपरी I झुंज न्यूज : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) लीगल सेलच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजयुमोची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.
भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय महामंत्री वैभव सिंह, प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे, प्रदेश उपाध्यक्ष निवेदिताताई एकबोटे, प्रदेश सचिव अजित कुलथे, प्रदेश सचिव तेजेस्विनी कदम, मा. उपमहापोर शहराध्यक्ष तुषार हिंगे, मा, शहराध्यक्ष संकेत चोंधे व लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. राजेश राजपुरोहित यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
यावेळी नवीन पाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शहराच्या सरचिटणीस (महामंत्री) पदी माहिती अधिकार अक्टीविस्ट प्रदीप नाईक व महेश मार्कड यांना स्थान देण्यात आलं आहे. उपाध्यक्ष पदी अमित चव्हाण यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सचिव पदी प्रतीक भालेराव व ॲड. नुपूर बोरा यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) लीगल सेलच्या नव्या कार्यकारणीमध्ये कार्यकारिणी सदस्य पदी हर्ष माक्रुवार व पुनीत हेगडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.