पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील ‘फ्युचर्स बॅकर्स फोरम’ने (FBF) दरवर्षी प्रमाणे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आई पालकांसाठी गृहलक्ष्मी आर्थिक साक्षरता कार्यक्रम व मार्गदर्शन सत्र आयोजित केले. यावर्षी या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात माॅडर्न गीताने करण्यात आली आणि सहभागींना महाविद्यालयाचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला.
वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डाॅ शुभांगी जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी FBF ची माहिती दिली. पुणे पीपल्स बँकेचे माजी कार्यकारी अधिकरी सदानंद दीक्षित यांनी पालकांच्या भूमिकेवर सहभागींशी संवाद साधला आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर :ऑनलाइन खाते ऑपरेशन प्रक्रिया, नामनिर्देशन, बँकिंग लोकपाल इ मार्गदर्शन केले.
या सत्रात पालकांसाठी प्रश्नमंजुषा होती. पालकांना पाच प्रश्न विचारण्यात आले आणि विजेत्या पालकांचा सत्कार करण्यात आला.बँक आँफ महाराष्ट्र साठी बँक मित्र विद्यार्थ्यांचा – बँक आणि विमा कनेक्ट आणि गुंतवणूक कनेक्ट – साठी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयीन स्तरावर आविष्कार स्पर्धेतील विजेत्या संघाचाही सत्कार करण्यात आला. आशिष शिंदेकर आणि श्री.नितीन महाडिक या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचाही त्यांच्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डाॅ मंजुषा कुलकर्णी त्यांनी कृतज्ञतेचे शब्द व्यक्त केले व कार्यक्रमाच्या शेवटी FBF द्वारे विकसित केलेल्या आर्थिक साक्षरतेविषयी प्रतिज्ञा वाचली. डॉ.पल्लवी निखारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रश्नमंजुषेचे समन्वय अँड. अदिती पिंपळे यांनी केले. कार्यक्रमाला पन्नास (50) माता पालक उपस्थित होते आणि 30 बँक मित्र स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी सहकार्य केले. हा कार्यक्रम प्राचार्य डाॅ संजय खरात यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडला. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॉसमॉस को ऑपरेटिव्ह बँक यांनी कार्यक्रम पुरस्कृत केला.