रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात दिव्यांग महामहोत्सव ; ३३ शाळांचा सहभाग
चिंचवड I झुंज न्यूज : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड या ठिकाणी विशेष मुलांचा यहा के हम सिकंदर या सांस्कृतिक कार्यक्रमांचा महामहोत्सव संपन्न झाला. दिव्यांग महोत्सवाची संकल्पना बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती च्या अध्यक्ष आणि अभिनेत्री नीलम शिर्के – सामंत यांच्या माध्यमातून साकार झाली.
दिव्यांग महामहोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती चे अध्यक्ष नीलम ताई शिर्के सामंत, उत्पादन शुल्कचे माजी आयुक्त कांतीलालजी उमाप , बालरंगभूमी परिषदेत पुणे च्या अध्यक्ष दिपाली शेळके , शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे , बिरदवडे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स चे धीरज बिरदवडे, मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, दिव्यांग महोत्सवाच्या समितीचे प्रमुख धनंजय जोशी , मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य अनंत जोशी , पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह देवेंद्र भिडे उपाध्यक्ष नारायण करपे, अरूण पटवर्धन , कोषाध्यक्ष स्मिता मोघे , राजू बंग, पंकज चव्हाण, रूपाली पाथरे ,विनायक कुलकर्णी, मयुरी, ईश्वरी ,प्रियंका हे उपस्थित होते.
विशेष मुलांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या 33 शिक्षकांचा सन्मान नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. दिव्यांग महोत्सवामध्ये 33 शाळांनी सहभाग नोंदवला. निगडी, गोखले नगर, कोथरूड, लक्ष्मी रोड, आळंदी देवाची, शिरूर, पाबळ, वाजे वाडी, पेरणे फाटा, चरोली बुद्रुक, बारामती भोसरी तळेगाव दौंड, मांजरी बुद्रुक, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, लोणी काळभोर ,शिवाजीनगर ,अंबडवेट, लोणीकंद, पुणे, धायरी, चिंचवड, बारामती, हिंगणे खुर्द, आंबेगाव या ठिकाणावरून शाळा आल्या होत्या. 41 परफॉर्मन्स सादर करण्यात आले.
दिव्यांग मुलांची प्रचंड एनर्जी दिसून आली . महोत्सवातील सहभागी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जेवणाची सुविधा उपलब्ध होती त्याचबरोबर 18 वर्षावरील कार्यशाळेमध्ये असणाऱ्या मुलांच्या तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन देखील होते. स्टॉलला ही प्रचंड प्रतिसाद मिळाला. शाळांनी समाधान व्यक्त केले.
विशेष मुलांसाठी रमेश गडदे आणि धीरज बिरदवडे यांनी स्वीट उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज डाळिंबकर यांनी केले. प्रास्ताविक दिपाली शेळके यांनी केले, उत्पादन शुल्कचे माजी आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग महोत्सवातीला व सादरीकरण करणाऱ्या मुलांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. नीलम ताई शिर्के यांनी विशेष मुलांसोबत आणि प्रेक्षकांच्या सोबत संवाद साधला दिव्यांग मुलांनी हे उत्तम प्रतिसाद दिला. आभार रंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष नारायण करपे यांनी मांडले.