वीणा संगीत विद्यालयाच्या प्रथम वर्धापनदिन उत्साहात….

पं.सुधीर नायक यांच्या एकल संवादिनी वादनाचा आणि पं. शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाचा आस्वाद

निगडी I झुंज न्यूज : निगडी प्राधिकरणामधील ज्ञानप्रबोधिनी संकुलाच्या सभागृहात वीणा संगीत विद्यालयाच्या प्रथम वर्धापनदिना निमित्य कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पं.सुधीर नायक यांच्या एकल संवादिनी वादनाचा तसेच पं. शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला.

पं.सुधीर नायक यांनी मुलतानी या रागात विलंबित एकताल, द्रुत त्रिताल व द्रुत एकतालात बंदीशी सादर केल्या. यानंतर देस तिलक रागातील धून, एक भावगीत तसेच एक अभंग सादर करुन आपले वादन संपविले. त्यानंतर पं. शौनक यांनी प्रथम प्रतापवराळी हा राग सादर केला. या रागानंतर कलावती व झिंजोटी या रागांचा अंतर्भाव असलेली ठुमरी सादर केली.

कार्यक्रमाची सांगता त्यांनी अभंगांच्या मालिकेनी केली. त्यांना तबल्याची साथ हृषीकेश जगताप यांनी तर संवादिनीची साथ सुधीर नायक यांनी केली. मध्यंतरापूर्वी कलाकारांचा सत्कार पं विनोद डिग्रजकर तसेच राजेंद्र व प्रथमेश पोफळे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन विद्यालयाच्या संचालिका डॅा. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय नलगे यानी केले. कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *