प्रहार आपण क्रांती आंदोलनाचा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या पॅनलला जाहीर पाठिंबा…

पिंपरी I झुंज न्यूज : पथ विक्रेता समिती निवडणूक निवडणूक २०२४ करिता महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने उमेदवारांचे पॅनल उभे करण्यात आलेले आहे या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला.

सर्वसाधारण गट -किरण श्रीधर साडेकर
सर्वसाधारण गट -राजू विलास बिराजदार
सर्वसाधारण महिला गट-संगीता दत्तात्रय शेरखाने
अनुसूचित जाती गट – प्रल्हाद रामभाऊ कांबळे
अनुसूचित जमाती गट -किसन रामा भोसले
अल्पसंख्यांक गट -सलीम बाबालाल डांगे
विकलांग गट -अलका सुनील रोकडे
कप बशी या चिन्हासमोर शिक्का मारून या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच महासंघाचे आपले सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी प्रयत्नशील राहतील असा पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या बैठकीमध्ये ठराव करून आज त्यांनी पत्र दिले आहे.

“महासंघाचे वतीने अनेक सकारात्मक निर्णय फेरीवाल्यांच्या बाबतीत घेतलेले असून आम्ही सर्वजण मिळून सभागृहामध्ये अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत तसेच दिव्यांग प्रवर्गासह इतर सदस्य यांनी चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवावे असे मत राजेंद्र वाकचौरे यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रहार आपण क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता काळभोर , समिती पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते, रामचंद्र तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, अशोक भोपळे, भग्यश्री मोरे, अहिरे सर, संगीता पटेल दत्ता गाडेकर ,इरफान चौधरी, सहदेव होनमाने, सागर बोराडे, फरीद शेख, अंबालाल सुकवाल, तुकाराम माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *