स्पर्धेत ३०० हुन अधिक विद्यर्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
थेरगाव I झुंज न्यूज : भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा सण “दीपोत्सव”म्हणजे दिवाळी.. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा हा सण आनंदाने साजरा करण्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून प्रेरणा प्राथमिक विद्यामंदिर मध्ये “आकर्षक सुंदर आकाश कंदील तयार करण्याची रंगीबेरंगी स्पर्धा” घेण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणारे कौशल्य विकसित व्हावेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतून शाळेत आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून तब्बल तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आकर्षक व पर्यावरण पुरक असे आकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात सहभागी झाले होते, त्यामुळे शाळेत मुलांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
इयत्ता सहावी मध्ये प्रथम क्रमांक कु. अनन्या सूर्यकांत टिंगरे इयत्ता सहावी अ, द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी नितीन झोंबाडे इयत्ता सहावी क, तृतीय क्रमांक चि. स्वराज राम मंडलिक इयत्ता सहावी ब. या वर्गाचे परीक्षण श्रीम. सोनाली ढवळे, सौ इंदू जगताप, श्री. ज्ञानेश्वर बोरसे यांनी केले.
इयत्ता सातवी मध्ये प्रथम क्रमांक कु अनुष्का केशव गव्हाणे इयत्ता सातवी ब, द्वितीय क्रमांक कु. श्रावणी लखन मंडलिक इयत्ता सातवी अ, तृतीय क्रमांक कु. सोनाक्षी सुनील वाघमारे इयत्ता सातवी क. या वर्गाचे परीक्षण सौ. अनिता साखरे, सौ. सोनाली वाघमारे, सौ रेखा नांदोडे यांनी केले.
मुख्याध्यापक महेंद्र पवार, पर्यवेक्षक प्रवीण कुऱ्हाडे यांनी या स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. स्पर्धाप्रमुख इंदू जगताप यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध रंगांचे आकारांचे आगळे वेगळे आकाश कंदील बनविण्यात विद्यार्थी मग्न झाले होते. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात स्पर्धा पार पडली.