पेरीविंकलच्या शिवम महाले याने पटकावली मानाची गदा…

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

प्रयत्नपूर्वक मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद – राजेंद्र बांदल

पिरांगुट I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या पिरंगुट शाखेतील शिवम महाले याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन करुन प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल बक्षीसरुपी गदा बहाल करण्यात आली.

पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड आयोजित राष्ट्रीय उपकेसरी स्पर्धा ही पुणे व औंध येथे आयोजित करण्यात आली होती. शारीरिक तसेच मानसिक क्षमता कस लावून बघणारा एक क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती. लाल मातीशी आपले नाते आणखी दृढ करणारा हा खेळ ग्रामीण भागाशी आपली नाळ घट्ट जोडून असलेला दिसतो. आणि म्हणूनच मुळशी तालुक्यातून पेरीविंकल च्या शिवम महाले याने 51 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत मानाची गदा मिळवून शाळेची व पालकांची मान उंचावली. शिवम ने प्रयत्नपूर्वक मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. त्याची शाळा अभ्यास आणि कुस्तीचा सराव हे सर्व सांभाळून त्याने मिळवलेले हे यश त्याला स्वत:ला आणि इतरांनाही नक्कीच स्फूर्ती देणारे आहे.

त्याच्या या यशात त्याला भक्कम पाठिंबा देणारे व मनोधैर्य वाढवणारे शाळेचे व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे असे त्याने सांगितले. या यशाचा मानकरी जरी शिवम असला तरी त्या यशाचे खरे सारथी हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद बांदल सर, शाळेच्या संचलिका रेखा बांदल तसेच तरुण तडफदार नेतृत्व असलेल्या शाळेच्या डायरेक्टर शिवानी बांदल तसेच शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांचे सहकार्य याला आहे.

तसेच क्रीडा शिक्षक हनुमंत मनेरे, पर्यवेक्षिका पूनम पांढरे व सना इनामदार व पालकांची महत्वपूर्ण साथ याचेही सहकार्य लाभले. आणि या एकत्रित प्रयत्नांनी कुस्तीचा आणखी एक फड पेरीविंकलच्या शिवम महालेने गदा पटकावून सहज जिंकला ही खरोखरच आनंदाची व कौतुकाची बाब आहे असे प्रतिपादन शाळेच्या डायरेक्टर शिवानी बांदल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *