टाटा मोटर्स एम्पलाइज यूनियनचे मा. जॉइंट सेक्रेटरी महेंद्र कदम यांचे प्रतिपादन
पिंपरी । झुंज न्यूज : सामाजिक व त्यागशील भावनेने काम करणे हीच स्व. रतन टाटा यांना श्रद्धांजली ठरेल . असे प्रतिपादन टाटा मोटर्स एम्पलाइज यूनियनचे मा . जॉइंट सेक्रेटरी महेंद्र कदम यांनी केले .
अस्तित्व फाऊंडेशनने आयोजित केलेल्या श्रद्धाजंलीच्या कार्यक्रमात पुढे बोलतांना कदम यांनी स्व. रतन टाटा यांचे आणि कामगारांशी असलेल्या संबंधावर बोलतांना काही आठवणी सांगितल्या त्यात प्रामुख्याने रतन टाटा यांनी आपल्या कामात आधी महत्व कशाला ध्यायचे हे त्यांच्या कृतीतून शिकवण दिली . हा प्राधान्यक्रम प्रत्तेकाने जरी पाळला तरी त्या व्यक्तिच्या उत्कर्षाच्या वाटा कधीच थांबणार नाही .
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुरडेकर म्हणले, देशाच्या उत्कर्षात टाटा समुहाचे सर्वात मोठे योगदान आहे . किंबहुना केवळ पिंपरी चिंचवड औद्दोगिक नगरी ही टाटा समूहामुळेच विकसित झाली . एकटया टाटा मोटर्समुळे हजारों लघु उद्योग निर्माण झाले तर त्यात लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला . त्यांमुळे टाटा समूह आपल्या शहराची जीवन दायिनी म्हाटल्यास वावगे ठरू नये .
यावेळी गुणवंत कामगार व लेखक प्रकाश परदेशी यांनी स्व . रतन टाटा यांच्यातील माणुसकीच्या काही उदाहरणाचा उल्लेख केला. तर आम आदमी पार्टी प्रदेश उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे यांनी रतन टाटा यांच्या आठवणीना उजाळा दिला.
व्यासपीठावर आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुरहाडे उपस्थित होते. जमलेल्या उपस्थितां मधून ज्ञानेश्वर ननावरे, सरोज कदम, चंद्रमनी जावळे, अथर्व ढवळे व इतरानी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल त्रिभुवन यांनी तर अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आभार मानले .