विद्यार्थी किंवा खेळाडूंना ईजा झाल्यास जबाबदार कोण..? – सुहास कुदळे
पिंपरी I झुंज न्यूज : स्मार्ट सिटी असलेल्या शहरातील पिंपरी येथे असलेल्या महात्मा फुले महाविद्यालय व नव महाराष्ट्र विद्यालय परिसरातील मैदानाची दुरावस्था झाल्याने विद्याथ्यांनी व खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एखाद्या विद्यार्थी किंवा खेळाडू यांना ईजा झाली तर त्याला जबाबदार कोण.? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी परिसरातील हे सर्वात मोठे मैदान असल्याने तेथे आजू बाजूच्या गावातील अनेक खेळाडू या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. तसेच शाळेच्या कवायत व खेळ या ठिकाणी होत असतात. मात्र सध्या मैदान असूनही मोकळेपणाने खेळण्यासाठी त्रास होत आहे.
गेल्या २ महिन्यापासुन राडा – रोडा – मोठ- मोठे दगडी पडलेल्या आहेत त्यामुळे शाळेतील विद्यार्थांना व खेळाडू वर्गाला खुप नाहक त्रास होत आहे. मैदानाची दयनीय अवस्था इतक्या खराब प्रमाणत आहे की तेथे जर काही घटना घडली तर एखाद्या खेळाडूचा किंवा विद्यार्थी यांचा जीव जाऊ शकतो. आयुक्त साहेब व महापालिका अधिकारी यांनी लवकरात लवकर या मैदानाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.