वाकड I झुंज न्यूज : वाकड येथील सद्गुरु कॉलनी क्रमांक दोन मध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
भारतभर २ ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गांधीजींना आणि त्याच्या अहिंसात्मक विचारांचे स्मरण केले जाते. त्यांना आदरांजली वाहिली जाते. देशभर शाळा-कॉलेजमध्ये गांधीजींची जयंती साजरी केली जाते.
गांधींचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याची महत्ता आजही आपल्याला शिकवते की शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वाचे योगदान आहे. असे प्रतिपदान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी कॉलनीतील शिवभक्त पांडुरंग शेडगे, सुनील शेडगे, बसवराज रेड्डी, नवनाथ चौधर, भरत सूर्यवंशी, पुरुषोत्तम पाटील, मनोहर पाटील, रवींद्र सैदाणे , ज्ञानेश्वर जाधव , विनोद शेळके, गणेश शेळके, आनंद कांबळे, हिरवे शिवाजी, राजकुमार बोंडे, संदीप माने यांसह अनेक रहिवाशी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.