अभिमानास्पद ! प्रसन्न कंधारे याने पटकावली दोन कांस्यपदक

चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेत भारताच्या संघास विजेतेपद

मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कविता पप्पू कंधारे यांचे चिरंजीव विशेष दंडाधिकारी अनंतराव चौधरी यांचे नातु आंतरराष्ट्रीय खेळाडू कु प्रसन्न पप्पू कंधारे यांना केरळ या ठिकाणी झालेल्या जागतिक सिलंबम स्पर्धेत प्रसन्न कंधारे यांना दोन कांस्यपदक मिळवून मुळशी तालुक्याचे नाव रोशन केले आहे तर प्रसन्न कंधारे हा सिलंबम स्पर्धेत देशाचे नेतृत्व केले आहे.

जिमी जाॅर्ज इंडोअर स्टेडियम तिरूअनंतपुरम केरळ या ठिकाणी लाठी-काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, सुरूल, मडू इत्यादी क्रीडा प्रकारात झालेल्या चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 47 खेळाडूंनी भारतीय सिलंबम संघाचे प्रतिनिधित्व करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

पदक विजेत्या खेळाडूंची नावे : 1) शिवम कोठावळे एक सुवर्ण,एक कास्य, 2)कार्तिक काळे एक सुवर्ण, एक कास्य,3) समर्थक वर्धेकर एक सुवर्ण, एक कास्य 4)चैतन्य रसाळ एक सुवर्ण 5)अद्वैत शिंदे एक सुवर्ण, एक कास्य,6) अद्वैत बनकर एक सुवर्ण 7)सोहम तावरे एक सुवर्ण, एक कास्य,8) प्रितेश राठोड एक सुवर्ण, एक कास्य, 9)राजवीर सुतार एक सुवर्ण, एक कास्य 10)लोकेश देवकर एक सुवर्ण 11) चिन्मय कुलकर्णी एक सुवर्ण, एक रौप्य 12) मनवा कुलकर्णी एक सुवर्ण, एक रौप्य 13)देवश्री महाले एक सुवर्ण, एक कास्य 14)आशना चव्हाण एक सुवर्ण, एक कास्य 15)मानसी भिसे एक सुवर्ण, एक रौप्य 16)ब्रह्माक्षी मस्के दोन सुवर्ण 17)विवान चक्के एक रौप्य, एक कास्य 18)प्रभाव नेरकर एक रौप्य, एक कास्य 19)अर्णव घोडके एक रौप्य, एक कास्य,20) आयुष शिंदे एक रौप्य, एक कास्य 21)स्वरूप सणस एक रौप्य, एक कास्य 22)मल्हार सोनवणे एक रौप्य एक कास्य 23)भूषण बोडखे एक रौप्य, एक कास्य 24) शंतनू उभे एक रौप्य, एक कास्य 25)ओम संगपुल्लम दोन रौप्य 26)सिद्धी संपगावकर दोन रौप्य 27)आराध्या पावटेकर एक रौप्य, एक कास्य 28)प्रांजल कापसे एक रौप्य 29) अन्वी मेढेकर एक रौप्य 30)स्वानंदी कोडगुले एक रौप्य, एक कास्य 31) कबीर पैठणकर दोन कास्य 32) शार्लव यादव दोन कास्य 33)महादेव पवार दोन कास्य 34) स्पंदन शहा दोन कास्य कास्य 35)श्रीपादराज रायरीकर एक कास्य 36)देवांश चव्हाण एक कास्य 37) वेदांत अंकले एक कास्य 38)प्रणव पांढरे दोन कास्य 39)प्रसन्न कंधारे दोन कास्य 40) शिवम पोटे एक कास्य 41) अथांग गुणेकर दोन कास्य 42)मुद्रा बोडके दोन कास्य 43)अवनी देशमाने दोन कास्य 44)ज्ञानेश्वरी मोरे दोन कास्य 45) स्वामिनी जोशी दोन कास्य 46) ईश्वरी भोकरे दोन कास्य 47)संतोषी कोत्तावार एक कास्य.

सर्व खेळाडू पुणे भारत स्काऊट अँड गाईड ग्राउंड सदाशिव पेठ, नामदार शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन धनकवडी, पंडितराव आगासे स्कूल लॉ कॉलेज रोड, वनाज परिवार विद्यामंदिर कोथरूड, डी.ई.एस. इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल टिळक रोड, महेश बालभवन कोथरूड, धर्मवीर संभाजी महाराज व्यायाम शाळा गोकुळ नगर इत्यादी ठिकाणी मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले, प्रशिक्षक दिलीप आव्हाळे, शक्तीप्रसाद पात्रा, अवंती सकुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *