राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुर्तिजापूर मतदार संघात घोंगडी बैठक
मुर्तीजापुर I झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध मतदार संघात 29 ऑगस्ट. 2024 ते 2 सप्टेंबर . 2024 दरम्यान घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात 18 वक्ते सहभागी झाले होते.
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि ओबीसीसाठी केलेल्या कामासंदर्भात माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. घोंगडी बैठकीचा दुसरा टप्पा 11 सप्टेंबर 2024 ते 16 सप्टेंबर 2024 दरम्यान होणार आहे या दुसऱ्या टप्प्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील 44 विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
घोंगडी बैठकांतून घ्यावयाचे मुद्दे
१) बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार .
२) आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान
३) महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात राज्यासाठी घेतले गेलेले महत्वपूर्ण निर्णय आणि भूमिका
४) या महाराष्ट्रातल्या संत थोर पुरूषांच्या आत्मचरित्राचा सत्ताधा-यांनी केलेला घोर अवमान
५) आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत झालेली गद्दारी, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला मदमस्त सत्ताधा-यांनी लावलेली काळीमा
६) ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी तसेच समाजातल्या सर्वागीण घटकांच्या विकासासाठी आवश्यक असलेली जातीनिहाय जनगणना, ही आपल्या पक्षाची ओबीसी प्रर्वगातील उपेक्षित घटकांसाठीची प्रमुख मागणी,
७) विश्वकर्मा समाजासाठी असलेले आर्थिक महामंडळ तथा कुंभार समाजाला आश्वासित केलेले मातीकला बोर्ड तर नाभिक समाजाला आश्वासित केलेले केश कर्तनालय बोर्ड किंवा महाज्योती संस्था अश्या व इतर महामंडळांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील घटकांना आवश्यक असलेली आर्थिक निधी राज्य सरकारकडून पुरवला जात नाही.
८) राज्यातील बिघडलेल्या परिस्थितीत सामाजिक सलोखा राखण्याच्या आणि सामाजिक ऐक्य ठिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाची भूमिका
९) सत्ताधा-यांच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील शेवटच्या घटकांच्या मनात राज्यसरकारच्या बददल कमी होत चाललेली विश्वासार्हता आणि वाढत चाललेली असहिष्णूता
१०) ओबीसी प्रवर्गातील दुर्लक्षित घटकांना अठरा पगड जातींना पक्ष संघटनेसोबत जोडणे .
११) स्थानिक पातळीवर करण्यात आलेली समाज उपयोगी कामे जनसामान्यांपर्यत पोहोचवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांची नाल सर्वसामान्य लोकांसोबत घट्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तसेच सामाजिक ऐक्यासाठी गावागावात लोकांमध्ये संवाद घडवून आणला.
मुख्य वक्ते भाई विशाल जाधव यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ झाला. मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, शहराध्यक्ष राम कोरडे, मुर्तीजापुर विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष दिपाली देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष निखिल गाढवे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष साबीर शेख,जिल्हा महासचिव पिंटू भाऊ वानखेडे, प्रदेश संघटक सचिव रवी भाऊ राठी, सम्राट डोंगरदिवे, एड. शेखर वाकोडे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अतुल गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन गावंडे, तेजस जामटे, प्रदेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष श्रीधर कांबे,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष इब्राहीम घाणीवाला, ओबीसी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम, ओबीसी शहराध्यक्ष विशाल शिरभाते, तालुका कार्याध्यक्ष राहुल कडू, तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण बाजड, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष निजामभाई इंजिनियर, अब्दुल जावेद, रवी मार्कंड,आनंद पवार, निखिल ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सोशल मीडिया प्रमुख विलास सावळे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्जन राजे पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू भाऊ लोडम कार्याध्यक्ष ओबीसी विभाग अकोला जिल्हा, प्रास्ताविक प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. गजानन वाकोडे, पिंटू भाऊ वानखेडे आभार महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अकोला यांनी व्यक्त केले.