पिंपरी I झुंज न्यूज : लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या पदग्रहण व शपथ विधी नुकताच रावेत येथे संपन्न झाला. यावेळी क्लब अध्यक्षपदी ला. शिवाजी माने यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी ला. महेश पांचाळ, खजिनदार पदी ला.विलास कातोरे, उपाध्यक्षपदी ला. विक्रम शक्तावत, ला.फैयाज लांडगे , क्लब फस्ट लेडी ला. सविता माने, यांची निवड करण्यात आली पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एम.जे. एफ. ला .नरेंद्र भंडारी, व डिस्ट्रिक्ट गेट कॉर्डिनेटर एम.जे.एफ.ला. राजेंद्र गोयल यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना पदग्रहण व शपथ दिली.
हि निवड ही सन २०२४-२५ या वर्षासाठी आहे. यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी तर्फे मातृसेवा संस्था चिंचवड पुणे येथील दिव्यांग महिलांसाठी २० हजार रुपयाचे मेडिकल किट व धान्य व किराणा देण्यात आला. तसेच अभिसार फाउंडेशन रहाटणी व रियल लाइफ रियल पीपल या संस्थांना प्रत्येकी ११ हजार रु. चा धनादेश देण्यात आला. क्लब चे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.शिवाजीराव माने यांनी आपल्या मनोगतात वर्षभरातील सेवाकार्य याचे नियोजन सांगितले.
यावेळी एम.जे.एफ.ला. नरेंद्र भंडारी यांनी झोन चेअर पर्सन एम.जे.एफ.ला. वसंतभाऊ कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी क्लब चांगले काम करत आहे. क्लब ची थीम शिव-पर्व आहे. क्लब चे अध्यक्ष यांचे नाव शिवाजी आहे. त्यामुळे यावर्षीचे क्लबचे सेवा कार्य अतिशय जोमाने होईल यात शंका नाही. त्यांनी क्लबच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांचे सदस्यांचे कौतुक केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी ला. अशोक बनसोडे, ला.समीर अगरवाल, ला.अमोल दापुरकर, ला.प्रशांत गोमकाले, ला.प्रमोद भोंडे, ला. धीरज कदम, ला.अभिषेक मोहिते, ला.खिरानंद दड्डे, ला.अविनाश बारणे, प्रशांत तेलंग व सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्हॉइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वन एम.जे.एफ.ला.राजेश अगरवाल, रिजन चेअर पर्सन ला. शैलेजा सांगळे, रिजन मधिल सर्व क्लब चे अध्यक्ष, सचिव,खजिनदार, लायन सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन ला. भूपेंद्रसिंग दुल्लत व ला. प्राची पांचाळ यांनी केले तर आभार ला. समीर अगरवाल यांनी मानले.