शहरातील सर्व शाळेतील सुरक्षारक्षक व कर्मचारी यांचे पोलीस चारित्र्य पडताळणी बंधनकारक करा…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक ; आयुक्तांना निवेदन

पिंपरी । झुंज न्यूज : राज्यामध्ये अनेक शाळेमध्ये दुर्दैवी घटना घडत आहे यामध्ये अनेक शाळांमध्ये लहान मुलीं वरती अतिप्रसंग, लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकार वाढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अनेक दिवसांपासून विद्यार्थी सुरक्षेचा या विषया संदर्भात खालील बाबीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आज पोलीस उप आयुक्त विशेष शाखा/गुन्हे श्री संदीप डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील सर्व सुरक्षारक्षक एजन्सी येथे कार्यरत असलेले सुरक्षारक्षक कर्मचारी, हाऊस किपिंग कामगार यांचे पोलीस चारित्र्य पडताळणी बंधनकारक केले पाहिजे या ठिकाणी काम करणारे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला प्रत शाळा व्यवस्थापन, कार्यरत असलेले ठिकाण जवळील पोलिस चौकी व स्टेशन येथे प्रत देणे बंधनकारक करावे. पाहिजे.
पोलीस हेल्पलाईन क्रमांक मोठ्या अक्षरात शाळा, महावि‌द्यालय, क्लासेस दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात यावे. दामिनी पथक शाळा, महावि‌द्यालय व क्लासेस ठिकाणी सकाळी ते सायं पर्यंत गस्त वाढवावी.

प्रत्येक शाळा, महावि‌द्यालय व खाजगी क्लासेस येथे तक्रार पेटी ठेवणे. पोलीस काका व पोलीस ताई योजना त्वरीत सुरु करण्यात यावी.
स्थानिक पोलीस वर्गातील कार्यरत असणारे सहकारी यांनी दर ८ दिवसांनी शाळा प्रशासन यांच्याशी संवाद ठेवावा. तसेच सी.सी टिव्ही हाय डेफिनेशन चे उपकरणे बसवणे व या बाबत सर्व शाळां आवारात मध्ये बंधनकारक करण्यासाठी आपण शाळा महावि‌द्यालय व क्लासेस प्रशासन यांना आव्हान करावे व तात्काळ परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्यात यावी.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत महादेव डांगे,शहरअध्यक्ष अनिकेत परशुराम प्रभु.उपशहराध्यक्ष ओंकार पाटोळे,प्रतिक शिंदे,वि अध्यक्ष आकाश पांचाळ हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *