पेरीविंकलचे विद्यार्थी घडवतील उद्याचा विकसित भारत – महेश लोहार

बावधन I झुंज न्यूज : पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे गुरवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकावून व ध्वजगीत, राष्ट्रीय गायनाने तिरंग्याला मानवंदना देऊन करण्यात आली.

इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वरात देशभक्ती पर गीत सादर केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी व हिंदी अशा विविध भाषांमधून विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचे मनोगत व्यक्त केले. इयत्ता ४वी व ५वी च्या विद्यार्थ्यांनी मनोऱ्याचे नयनरम्य प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.

यावेळी प्रमुख पाहुणे, महेश लोहार यांनी रिसर्च स्कॉलर ऑर्गनायझेशनल कन्शियसनेस यावर पीएचडी संपादन केली आहे. व आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय दुधाने, चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक राजेंद्र बांदल उपस्थित होते.

यावेळी महेश सरांनी पेरीविंकलचा विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक मूल्ये जोपासलेली आहेत. आणि हेच विद्यार्थी उद्याचा विकसित व विकसनशील भारत घडवतील असा विश्वास व्यक्त करत सुवर्णपदकासारखे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच उपस्थित अतिथिनी योगासनाच्या दृष्टिने विश्वप्रार्थतेचे महत्व समजावून सांगितले व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी विश्वप्रार्थना ध्यान धारणेतून सादर केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्वातंत्र्य दिन साजरे करण्यामागे देशभक्ती जागृत व्हावी, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी, सामाजिक ऐक्य वाढीस लागावे, अशी व्यापक दृष्टी असते. शाळा-महाविद्यालयांतदेखील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्यवीरांचे मोल कळावे, देशभक्ती जागृत व्हावी, सामाजिक भान यावे. आणि कुठेतरी जगण्याची दृष्टी मिळावी अशा व्यापक विचाराने राष्ट्रीय सणउत्सव जाणीवपूर्वक साजरे केले जातात. असे मत संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वतंत्र भारतानंतर आपली जी कर्तव्य आहेत ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील , कल्याणी शेळके व शिक्षक वृंद यांनी पाहिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सायली गायकवाड , विद्यार्थीनी कु. आर्या साठे , कु .आर्या भुंडे यांनी केले. सर्वांचे आभार प्रदर्शित करून, देशभक्तिपर नारे लावून , सर्वात शेवटी मुलांना खाऊ वाटप केला व वंदेमातरम् ने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *