सासवड I झुंज न्यूज : “ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम” चा जय घोष करीत टाळमृदुंगाच्या गजरात श्री संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज पालखीचे श्री क्षेत्र अरणकडे प्रस्थान झाले आहे. श्रीक्षेत्र अरण या पायी वारीचे हे ७ वे वर्षे आहे.
श्री क्षेत्र सासवड सोपान काका समाधी स्थळ ते अरण (तालुका माढा जिल्हा सोलापूर) श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी स्थळ असा पायी पालखी सोहळा गेली सात वर्षापासून हभ प दिलीप महाराज झगडे यांच्या संकल्पनेतून ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे बाळासाहेब बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघत आहे.
दरम्यान पुरंदरचे आमदार संजय जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिगंबर दुर्गाडे यांनीही सोहळ्याला भेट दिली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी सावता सेना महाराष्ट्र राज्य, विकास कांतीलाल नरके, लोंणद संस्थापक विजय गोरे, अध्यक्ष हभप.दिलीप महाराज झगडे, हभप महवीर भुजबळ, हभप दत्त्तात्रय फरांदे, भानुदास महाराज, बाळासाहेब बारवकर यांसह हिंगणे ग्रामस्थ व भाविक वारकरी उपस्थित होते.