मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते व विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर यांच्यावतीने आयोजन

पिंपरी I झुंज न्यूज : शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख हरेश नखाते, महिला आघाडीच्या विभाग संघटिका सुजाता नखाते आणि विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी यूनिव्हर्सल हेल्थ केअरच्या वतीने ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर भारतीय डाक सेवेच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला. नव मतदारांसाठी मतदार नाव नोंदणी राबविण्यात आली. त्याचबरोबर पासपोर्ट, पॅनकार्ड, गॅजेट यांसारखे महत्वाची कागदपत्रेही जागेवर काढून देण्यात आली. तसेच भारतीय स्टेट बँकेतही नागरिकांना नवीन खाते काढून देण्यात आले.

यावेळी काळेवाडी परिसरातील विविध क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी बजाविणाऱ्या ६४ कुटुंब प्रमुखांचा मावळ लोकसभेचे संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच १०वी-१२वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मावळ लोकसभेचे संघटक संजोग वाघेरे पाटील, राज्य संघटक एकनाथ पवार, महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख सुशीला पवार, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख दस्तगिर मनियार, युवा शहर अधिकारी चेतन पवार, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता तुतारे, शहर संघटक संतोष सौंदनकर, प्रहार जनशक्ती संघटनेचे संजय गायखे, गणेश आहेर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, मच्छिंद्र तापकीर, संतोष पवार, नितीन दर्शले, संदीप भालके, नवनाथ तरस, अमोल निकम, यांच्यासह पवना हेल्थ क्लबचे सदस्य, जय हरी ग्रुपचे सदस्य आणि शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी उपस्थितांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया,हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांबाबत तसेच स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती केली. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *