बोऱ्हाडेवाडी, मोशीतील वुड्सविले सोसायटीचा रस्ता होणार ‘चकाचक’ ; सुमारे २० हजार नागरिकांना दिलासा…

– आमदार महेश लांडगे यांची यंत्रणा लागली कामाला
– स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार काम ‘फास्ट ट्रॅक’वर !

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर म्हणून नावारुपाला येत असलेल्या बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. वुड्सविले सोसायटी, कुमार प्रिन्सविले सोसायटी अशा विविध सोसायट्यांना जोडणारा आणि श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथील महानगरपालिका विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. तसेच, वुड्सविले सोसायटी येथील १८ मीटर डीपी रस्ता विकसित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सदर डीपी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे, माऊली लांडे, मधुशेठ बोऱ्हाटे, सोनम जांभुळकर आदी उपस्थित होते. तसेच, स्थानिक भूमिपुत्र संतोष बोराटे, शंकर बोराटे, सिताराम बोराटे, सुनील बोराटे, महिंद्र बोराटे यांनी रस्त्याच्या जागेचा ताबा दिल्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

सुमारे २० हजार नागरिकांना दिलासा…
बोऱ्हाडेवाडी, मोशी परिसरातील वुड्सविले फेज- १, २, ३, प्रिन्सव्हिल्ला फेज- १ आणि २, सह्याद्री शिवगौरी, जीके, जीके पॅलेस, एसके गार्डन, बालाजी विश्व, इलेव्हन के-काउंटी, स्वराज्य हौसिंग, ब्यू बेरी, पॅरेडाईज, डिव्हाईन अशा अनेक सोसायटींना जोडणारा १८ मीटर डीपी रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे परिसरातील सुमारे २० हजार रहिवाशांना फायदा होणार आहे.

“समाविष्ट गावांच्या विकासासाठी आम्ही कायम आग्रही भूमिका घेतली आहे. समाविष्ट गावांची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने सातत्त्याने प्रयत्न करीत आहोत. २०१७ पासून या भागातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम केल्यामुळे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला. यापुढील काळात अंतर्गत रस्त्यांचे जाळे सक्षम करण्यावर भर देणार आहोत. सोसायटीधारक आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *