राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आय. एन. एच चा शोध…

२०१९ मध्ये भरलेल्या ‌फार्मांची परिक्षा २०२४ मध्ये

नागपूर I झुंज न्यूज : संपूर्ण भारतात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापनेवर मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने हजारो कर्मचारी अल्पशा प्रमाणात मिळणाऱ्या मानधनावर काम करित आहेत. नियमित कर्मचाऱ्यांचे बरोबरीने समान काम करित असताना महाराष्ट्र राज्य कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेतले नाही. त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन करण्यात यावे, यांसारख्या अनेक मागण्या घेऊन शासन दरबारी शेकडो निवेदन देण्यात आले.

आंदोलन, मोठमोठे मोर्चै , उपोषण केले परंतु महाराष्ट्र शासनाने झोपेत असल्याने आणि मंत्र्यांना जाग येत नसल्याने, राजकारणातील गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्यांनी समायोजन केले नाही.आतापर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापनेवर काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेच्या बॅनरखाली एकत्र येऊन न्याय. हक्क मिळविण्यासाठी खूप संघर्ष सुरू ठेवला. संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून हजारो रुपयांचा निधी जमा केला परंतु काहीच फायदा मिळाला नाही.. आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले खाते गरम करून घेतले.आताही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयकांच्या माध्यमातून आय .एन.एच. चा नवीन शोध लावला आहे.आय.एन.एच. आहे तरी काय असा प्रश्न विचारला सर्व ठिकाणी उपस्थित केला जात आहे.

येत्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला कायमस्वरूपी ऑर्डर मिळणार अशा अवस्थेत परिक्षा घेण्यात आली. पूर्ण NHM मध्ये एकूण 69 पदे आहेत त्यापैकी 6 पदं हे आस्थापनावर असलेले तांत्रिक पद आहे. शासनाने ठरवले तर उद्याच तांत्रिक पद ला ऑर्डर मिळू शकतात अशी आशा निर्माण करण्यात आली. परंतु उरलेल्या बाकी पदांची शैक्षणिक अहर्ता वेतनश्रेणी , समकक्ष पद आदी बाबी विचाराधीन आहेत.. प्रशासकीय काम थंडबस्त्यात असल्यामुळे वाट पहात बसावी लागणार आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ज्यांच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन नाही त्यांना देखील सेवा समावेशनात संधी आहे. सेवा जेष्ठता यादी ही कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच केली जाते आणि यात सेवा ज्येष्ठता, वेतन निश्चिती, कालबध्य पदोन्नती यांचा सामावेश असतो.. असे सांगितले गेले म्हणजेच आपण जीआर निघालेल्या दिवसापासून कायम झालो हे निश्चित आहे. NHM साठी एक नियम झालेला आहे. प्रत्येक वर्षी समायोजन प्रक्रिया 30-70 राबवली जाईल. हा नियम अन्याय करणारा आहे.

संपूर्ण राज्यात 31 डिसेंबर 2023 पर्यंतचे लोकांची यादी आणि त्या लोकांचे INH असा विषय झालेला होता परंतु GR निघालेल्या दिवसापर्यंतच सर्वांचं समायोजन होणार आहे का? आय.एन.एच हा काय प्रकार आहे हे समन्वयक असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट जाहीर करण्यात यावे. राज्यात अंदाजे एकूण 40000 पदे शिल्लक आहेत. त्याचे 30 % म्हणजेच 12000 लोकांचे समायोजन पहिल्या टप्प्यात होणार . हा टप्पा कधी सुरू होणार आहे. ज्यांचे INH असणार … त्यांनाच लाभ होईल का ? INH न देणारे वंचित राहू शकतात. ज्यांनी INH दिलेले नसेल त्यांनी सेवा ज्येष्ठता यादी लागल्यावर आपले नाव जर त्यात असेल तर त्यानी INH लगेच देण्याची तयारी ठेवावी असे समन्वयकांनी अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवर कळविले आहे.

मलेरिया विभागाची प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही संघटना आहे त्यांनी वेतन श्रेणी वेतन त्रुटी बद्दल शासनाकडे मागणी केलेली आहे. Inh ची संपूर्ण माहिती अनिल पारधी व पवन वासनिक ने सर्वांचे समोर दिली एका बैठकीचे आयोजन करुन दिली होती. सर्वानुमते INH जमा करण्यात येणार आहे असे निर्णय घेण्यात आले . ज्यांनी Inh जमा केले असेल त्यानी 4 दिवसांमधे पुर्ण Inh मुंबई मध्ये मा. महोदयला श्री वासनिक साहेब व श्री पारधी साहेब यांचे समोर जमा करावे असेही ठरले होते.

नवीन अध्यक्ष निवड व पदाधिकारी निवड करण्यात आले. त्याचे कारण सर्वांच्या समोर दिसून आले , आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तातडीने काही जबाबदाऱ्या काढून स्वतः पवन वासनिक आणि पारधी त्यांच्या टीमने स्वीकारल्या आहेत. मुंबई येथे ही बैठक यशस्वीरित्या पार पडली. बैठक सर्वांसाठी फायदेची ठरली.

“प्रथम टप्प्यात टेक्निकल लोकांचे समकक्ष पदावर समावेश होणार आहे का ? .त्यात येत्या दीड ते दोन महिन्याच्या आत ऑर्डर मिळणार अशा आशा निर्माण करण्यात आलेल्या आहेत .तसेच आर आर ची मुद्दा (फक्त टेक्निकल पदा साठी) पूर्णतः वगळण्यात आला आहे. ज्यांची 10 वर्षे सलग सेवा झाली आहे. त्यांनाच आडऀर मिळणार असतील तर या परिक्षांचे सोंग घेवून लुटमार केली जात आहे का.? पुढील पंधरा दिवसात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची सोनेरी पहाट उगवत आहे अशा भुलथापांची प्रतीक्षा संपलेली आहे. आता फक्त समन्वय समितीच्या मार्फत एक मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *