अतिरिक्तआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांचे प्रतिपादन
पिंपरी I झुंज न्यूज : ”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’’ अशी क्रांतिकारी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात पत्रकारितेच्या माध्यमातून देश स्वतंत्र करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय चळवळी उभ्या केल्या आणि लोकांमध्ये देशप्रेम निर्माण केले, असे मत अतिरिक्तआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन प्रसंगी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक अमित गावडे तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.