शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी…

मनसेची मागणी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना मनसेने दिले निवेदन…

शिरूर I झुंज न्यूज : शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना त्वरित मंजूर करावी. अशी मनसेची अतुलजी सावे गृहनिर्माण मंत्री यांच्या कडे मागणी केली आहे.

शिरुर नगरपरिषदेची स्थापना सन १८६८ मध्ये झालेली असून १५० वर्षांच्या इतिहासामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची घरकुल योजना नगरपरिषदेने राबविलेली नाही. गेली अनेक वर्षे परंपरागतरित्या सफाई कर्मचारी शिरुर शहराची स्वच्छता करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी त्याच कुटुंबातील किंवा जवळच्या नातलगांमधून सेवेत समाविष्ट केले जातात. परंतू हे कर्मचारी / कामगार आजही शहरातील झोपडपट्यांमध्ये राहत असून त्यांची दयनीय अवस्था आहे.

शहराचे आरोग्य चांगले रहावे म्हणून सदर कामगार रात्रंदिवस काम करत असतात. परंतू त्यांचे जीवन हालाखीचे बनले आहे. ते वास्तव्य करत असलेल्या झोपडपट्टयांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहांची कमतरता आहे. त्यांना मिळत असलेले पाणी ते सुध्दा अशुध्द स्वरुपाचे मिळते. तरी ही माणसे शहराच्या आरोग्यासाठी काबाड कष्ट करत असतात.

एकीकडे पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण केली आहे त्याचबरोबर पंचायत समिती, आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, म.रा.वि.वि.कं., तसेच पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वसाहती निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे मानवी दृष्टीकोनातून शहरातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा.

त्यासाठी लागणारी शासनाची जागाशहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिरुर शहरामधील हुडको कॉलनी जवळील सव्हें नं. ११४० मधील दत्त मंदिराजवळील मोठा भूखंड तसेच पाबळ फाटा येथील सर्व्हे नं. ११३०/१ब अशा अनेक जागा उपलब्ध आहेत.

इतिहासकालीन नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना शिरुर शहरामध्ये घरकुल बांधून मिळण्यासाठी शासन स्तरावर आपले माध्यमातून प्रयत्न व्हावेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला न्याय मिळेला पाहिजे. असे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे व मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे.

या मागणी वर गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे यांनी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री तथा मंत्री, नगरविकास, मंत्रालय, यांना सावे यांनी मनसेचे पत्र जोडून मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करण्याबाबत विनंती केली आहे.

मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांच्या निवेदनानुसार पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करण्याकरिता आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे पत्र व्यवहार गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे यांनी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री तथा मंत्री, नगरविकास, मंत्रालय यांना सावे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *