आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्यावतीने पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांची आरोग्य सेवा…

पुणे I झुंज न्यूज : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहेत. तीन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरीला पायी चालत निघाले आहेत. मंगळवारी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगाव येथील मुक्काम करून फलटण मुक्कामी असणार आहे. तर दुसरीकडे जगद्गगुरू तुकोबाराय यांच्या पालखीसोहळा सणसर मुक्काम करून पुढे आली. त्यासाठी वारकऱ्यांनी पायी वारी पंढरपुरकडे मार्गक्रमण करत आहे.

आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. या वारी दरम्यान पुणे ते पंढरपूर हा खूप मोठा प्रवास असून सर्व लहानथोर वारकरी हा प्रवास पायी करतात, यामध्ये राहणे खाणे व्यवस्था ही असते, परंतु या प्रवासात या लाखो वारकऱ्यांना गुढगे दुखणे, सर्दी खोकला, थंडी ताप या विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जात प्रवास करावा लागतो.

दिंडीत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्याचे हाल होऊ हे ओळखूनच पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप आणि विजय जगताप यांनी या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता दोन अंबुलन्स, १२ डॉक्टर आणि इतर कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता पुणे ते पंढरपूर अशी अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.

पंढरीच्या वारीत सेवा देण्याकरिता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर डॉ. महेश शिंदे, डॉ अभय पाटील, डॉ. देविदास शेलार, डॉ दिलीप सातव तसेच पॅरामेडीकल चे विद्यार्थी आपली आरोग्य सेवा देत आहेत. याचे वारकऱ्यांकडून कौतुक होताना दिसत आहे.

या दोन्ही पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरीता दोन रुग्णवाहिका आणि सात पिण्याच्या पाण्याचे टँकर ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून सेवेकरिता देण्यात आले आहेत. यंदा ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येत आहेत असे चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.शंकरशेठ जगताप यांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *