वाबळेवाडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत विक्रमी यश…

कौतुकास्पद ! पाचवी व आठवीचे ११ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

शिरूर I झुंज न्यूज : शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) मध्ये एकूण 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. पैकी 11 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून इयत्ता आठवीचा रूत्विज विशाल सावंत याने 278 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे, अशी माहिती मुख्याध्यापक श्री. विजय गोडसे यांनी दिली.

या शाळेचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.५वी) परीक्षेला ७५ विद्यार्थी बसले असून पात्र निकाल ९३.३३% आहे. तर ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून पैकी सहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

राज्य गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी व गुण खालील प्रमाणे –
अधिरा कालिदास शिरसाट – २८२ गुण( राज्यात ६वी ),प्रतिक संभाजी धुमाळ – २७६ गुण (राज्यात ११वा ), राजवर्धन नवनाथ चातुर – २७६ गुण ( राज्यात ११ वा ) स्वरूप दादा भागवत – २७६ गुण ( राज्यात ११ वा ),ज्ञानेश किरण आरगडे – २७२ गुण ( राज्यात १४ वा ),तनुश्री विठ्ठल टेमगिरे – २७२ गुण ( राज्यात १४ वा )

जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी व प्राप्त गुण –
श्रेया किरण पाटील – २७० गुण,अमिता तुकाराम बिराजदार – २६८ गुण,अवधूत भरत नवगिरे -२६४ गुण,स्वरूप माणिक दारकुंडे -२६४ गुण,अजिंक्य पोपट दरंदले -२६२ गुण,स्वरा अविनाश पऱ्हाड -२६२ गुण,सोहम किशोर राणे -२६२ गुण,आर्यन संदीप काळे -२५८ गुण,मानसी संदीप ढमढेरे -२५८ गुण,आरोही दिपक कोठावळे -२५६ गुण,भूमिका किकाराम मेघवाल -२५६ गुण,समृद्धी संतोष वाबळे -२५६ गुण,वरद रामचंद्र खैरे -२५४ गुण, प्रांजल लक्ष्मण सोनवणे -२५२ गुण,सान्वी प्रदिप बेंडभर – २५२ गुण, स्वराज रविंद्र साकोरे -२५२ गुण,स्वरा सतिश डफळ -२५२ गुण,अनुष्का संदीप भोसकर -२५० गुण,आरोही अजित पलांडे -२५० गुण, काव्या सुनिल गायकवाड -२५० गुण,समीक्षा नवनाथ राऊत -२५० गुण,आरूष सचिन बेंडभर -२४८ गुण, वेदीका विलास बाविस्कर -२४८ गुण,स्वराज वैभव राऊत – २४६ गुण, प्रसन्न बापू मोरे – २४२ गुण,तन्मय दिपक सूर्यवंशी – २४० गुण. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८वी) परीक्षेला ४१ विद्यार्थी बसले असून पात्र निकाल ९५.१२% आहे. तर ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून पैकी पाच विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

इ. ८वी राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी व त्यांचे गुण खालील प्रमाणे-
रुत्विज विशाल सावंत 278 गुण राज्यात तिसरा, विवेक गणेश कदम 272 गुण राज्यात सातवा, श्रावणी नवनाथ इंगवले 272 गुण राज्यात सातवी,अदिती बापू मोरे 258 गुण राज्यात 21 वी वेदांत नितीन बोऱ्हाडे 254 गुण राज्यात 25 वा

जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी व गुण खालीलप्रमाणे-
सिद्धी शामकांत माळी 250 गुण,अश्मिका शितल पाटील 250 गुण, मधुरा उत्तम काळे 248 गुण,सृष्टी रवींद्र नेमाणे 244गुण, पौर्णिमा दत्तात्रय मासळकर 242गुण,अपेक्षा जालिंदर वाबळे 240 गुण, ईश्वरी संजय मासळकर 238 गुण,दिशांत संदीप काळे 238 गुण,वेदांत जिवन तांबे 234,श्रीनिवास अनमोल करंजे 234 गुण,आदित्य अतुल शिंदे 232 गुण, आदिती संजय तांबे 226 गुण, असीम युनूस शेख 224 गुण,तन्मय लक्ष्मण शिवले 224 गुण,अभिनव सतीश बांगर 224 गुण,तनिष्का कैलास शेळके 220 गुण,शर्वरी ज्ञानदेव पाचर्णे 220 गुण,मीनल गौतम बर्गे 218 गुण,साईराज ज्ञानेश्वर मासळकर 218 गुण,अरमान सलीम मुलाणी 216 गुण, क्षितीज निलेश गवारी 206 गुण,यज्ञ शरद काळे 206 गुण,विनय संतोष गुप्ता 204 गुण,तनिष्का संजय वाघमारे 202 गुण,गौरी गणेश टेमगिरे 198 गुण, श्रीनाथ बाबाजी राऊत 194 गुण,राधाकृष्ण दत्तात्रय बुरंगे 192 गुण,साक्षी संतोष ढाकणे 192 गुण,भक्ती गणेश वाबळे 190 गुण,वैष्णवी गणेश रणदिवे 186 गुण. इ.५ वी च्या विद्यार्थ्यांना पोपट सूर्यभान दरंदले व दिपक बबनराव खैरे आणि इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांना जयश्री सुनिल पलांडे व सुनिल वसंतराव पलांडे यांनी मार्गदर्शन केले.

शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा अखंड राखल्याबद्दल केंद्रप्रमुख प्रकाश लंघे ,विस्तार अधिकारी वंदना शिंदे व गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी शाळेचे विशेष कौतुक केले आहे. सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी उपसरपंच केशवआण्णा वाबळे, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, माजी जि.प. सदस्या कुसुमताई मांढरे व रेखाताई बांदल यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *