पिंपरी-चिंचवडमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चा चिंचवड मतदारसंघातून उत्साहात शुभारंभ

पहिल्याच दिवशी २५ हजार महिलांना अर्जांचे वाटप, तर १५ हजार महिलांचे अर्ज भरले

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चिंचवड विधानसभा मतदारसंघात गुरूवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी चिंचवड मतदारसंघातील तब्बल २५ हजार महिलांना या योजनेच्या अर्जांचे वाटप करून १५ हजार महिलांचे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने प्रत्यक्षात अर्ज भरण्यात आले. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी झेरॉक्सपासून ते योजनेला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे महिलांना भाजपकडून मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने रहाटणी येथील विमन गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, भाजपचे प्रदेश सदस्य संतोष कलाटे, भाजपचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेविका निर्मला कुटे, सविता खुळे, मनिषा पवार, अश्विनी चिंचवडे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, सिद्धेश्वर बारणे, प्रमोद ताम्हणकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, बिभीषण चौधरी, संदिप गाडे, तानाजी बारणे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे, चिंचवड विधानसभा महिला मोर्चा प्रमुख कुंदाताई भिसे, पल्लवी वाल्हेकर, भारती विनोदे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, योगेश चिंचवडे, सोमनाथ भोंडवे, दिपक भोंडवे, विनोद तापकीर, नरेंद्र माने, गणेश नखाते, देवीदास तांबे, सनी बारणे, संजय मराठे, ऍड. गोरक्षनाथ झोळ, अरूणा सूर्यवंशी, करिश्मा बारणे, दिलीप गडदे, कुंदा गडदे, विजय कांबळे, गणेश ढोरे, दिपक नागरगोजे, प्रतिभा जवळकर, शोभा जांभुळकर, गणेश गावडे, राजुभाऊ गावडे, पियुषा पाटील, संदेश काटे, नरेश खुळे, हिरेन सोनवणे, दिलीप तनपुरे, दत्ता ढगे, शेखर चिंचवडे, आदेश नवले, युवराज ढोरे, नवनाथ जांभुळकर, राजू चिंचवडे, विजय गावडे, निलेश नखाते, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयांतर्गत निगडीचे मंडल अधिकारी वैभव भुतकर, देहूचे मंडल अधिकारी दिनेश नरवडे, तलाठी हनुमंत चांदेकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवीत आहे. आता महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. चिंचवड-चिंचवड शहरातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्याची सुरूवात चिंचवड विधानसभा मतदारसंघातून करण्यात येत आहे. महिन्याला १५०० रुपये मदत देण्याच्या या योजनेतून पिंपरी-चिंचवडमधील एकही महिला लाभार्थी वंचित राहू नये यासाठी महायुती सरकारने सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तत्परतेने काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी किंवा कागदपत्रे भरून देण्यासाठी महिलांकडे कोणीही पैसे मागत असेल तर राज्य शासन कठोर निर्णय घेत आहे. त्यानुसार एका अधिकाऱ्याला शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.

अंत्योदय हे महायुती सरकारचे उद्दीष्ट आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचे काम महायुती सरकार करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही महिलेला एक रुपयाचाही खर्च करण्याची गरज नाही. पिंपरी-चिंचवडमधील महिलांना झेरॉक्सपासून ते लागणारी सर्व कागदपत्रे भाजपकडून मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच या योजनेसाठी रेशनकार्ड आणि जन्माचा किंवा शाळेचा दाखला असेल तर उत्पन्न दाखला आणि अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाईल) आवश्यकता नाही. त्यामुळे महिलांनी तणाव घेऊन कागदपत्रे मिळविण्यासाठी कुठेही धावाधाव करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.”

“पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या महिलांनी ज्या भागात राहतात, त्या त्या भागातील भाजपचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधावा. सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भाजपकडून झेरॉक्सपासून ते आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे मोफत उपलब्ध करून दिले जातील. तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मोफत भरून शासनापर्यंत पोहचविले जातील.
-शंकर जगताप – शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड भाजपा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *